जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Adipurush: रावण आणि माता सीतेमधील तो सीन पाहून प्रेक्षक संतप्त; वाद वाढताच निर्मात्यांनी दिलं असं स्पष्टीकरण

Adipurush: रावण आणि माता सीतेमधील तो सीन पाहून प्रेक्षक संतप्त; वाद वाढताच निर्मात्यांनी दिलं असं स्पष्टीकरण

आदिपुरुषमधील सीता हरण या सीनवर निर्मात्यांचं स्पष्टीकरण

आदिपुरुषमधील सीता हरण या सीनवर निर्मात्यांचं स्पष्टीकरण

आज चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा दणकून प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर चित्रपटातील ‘सीता हरण सीन’ वर काही प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता. परंतु आता यादरम्यान निर्मात्यांनी या सीन संदर्भात एक लॉजिक व्हिडिओ जारी केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 16 जून :  प्रभास आणि क्रिती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला होता. कधी चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर तर कधी स्टार्सच्या लूकवरून वाद निर्माण झाला होता. याशिवाय चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आणि माता सीतेची भूमिका साकारणाऱ्या कृती सेनन यांच्या मंदिर परिसरातील गुड बाय किसिंग सिनमुळे  प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, तिकिटांच्या प्री-बुकिंगच्या बाबतीत हा चित्रपट इतर सर्व रेकॉर्ड तोडत असल्याचे दिसत आहे. एवढंच नाही तर आज चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांचा दणकून प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर चित्रपटातील  ‘सीता हरण सीन’  वर काही प्रेक्षकांनी आक्षेप नोंदवला होता. परंतु आता यादरम्यान निर्मात्यांनी या सीन संदर्भात एक व्हिडिओ जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. आदिपुरुषच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या सीता हरण सीनमुळे नेटकऱ्यांनी  निर्मात्यांना खूप ट्रोल केले होते. अशा परिस्थितीत, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्मात्यांनी यावर मौन सोडले आणि यामागील तर्क प्रेक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

News18लोकमत
News18लोकमत

सीता हरणच्या दृश्यावर गोंधळ का? खरे तर आदिपुरुषच्या ट्रेलरमध्ये रावण माता सीतेला हात न लावता पळवून नेतो असे दाखवण्यात आले आहे. निर्मात्यांनी VFX च्या माध्यमातून दृश्य अतिशय आकर्षक करण्याचा प्रयत्न केला. पण, हा सीन पाहिल्यानंतर यूजर्सने सोशल मीडियावर मेकर्सला ट्रोल करायला सुरुवात केली आणि रामानंद सागरच्या रामायणातील सीता हरण सीनशी तुलना करायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत आदिपुरुषच्या  निर्मात्यांनी आता या दृश्यावर मौन सोडले आहे. या चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी हा सीन असा का दाखवण्यात आला ते सांगितलं आहे. ‘Adipurush चांगला नाही’; Review देणाऱ्याला प्रभासच्या फॅननं थिएटरबाहेर धू धू धुतला, Video व्हायरल चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशीर यांनी आदिपुरुषाच्या सीता हरण दृश्यावर झालेल्या गोंधळासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी या दृश्यामागील तर्क स्पष्ट केला आहे. त्यांनी सांगितले की माता सीतेच्या आधी रावणाने आपली सून रंभाला आपल्या वासनेचा बळी बनवले होते. ज्यावर रंभाने रावणाला शाप दिला होता की, जर त्याने कोणत्याही स्त्रीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श केला तर त्याच्या सर्व दहा शिरांचे तुकडे होतील. यामुळेच रावणाने सीतेला स्पर्श न करता पळवून नेले होते.

जाहिरात

मनोज मुंतशीर यांच्या बोलण्याशी प्रेक्षक कितपत सहमत आहेत आणि किती ते प्रेक्षकांवर अवलंबून नाही. पण, सध्या प्रभास आणि क्रिती सेनॉनचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात प्रभास आणि क्रितीशिवाय सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे, तृप्ती तोरडमल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात