राज की बात चिठ्ठीतून समोर! करीनासोबत लग्न थाटलं त्याच दिवशी सैफनं अमृता सिंहला लिहिलं पत्र, कारण...

राज की बात चिठ्ठीतून समोर! करीनासोबत लग्न थाटलं त्याच दिवशी सैफनं अमृता सिंहला लिहिलं पत्र, कारण...

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज 49 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Share this:

मुंबई, 16 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आज 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकताच त्याची वेब सीरिज सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन रिलाज झाला आहे. बॉलिवूडचा नवाब म्हणजे भोपाळच्या पटौदी राजघराण्याचा वारस सैफन बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी जागा बनवली आहे. महान क्रिकेटपटू मंसूर अली खान पटौदी याच्या मुलानं आपल्या वडीलांच्या प्रोफेशनमध्ये लक्ष न घालता आई शर्मिला टागोर यांच्या प्रोफेशनला प्राधान्य दिलं. सैफनं 1993 मध्ये ‘परंपरा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता तर त्याची मोठी मुलगी सारा अली खाननंही बॉलिवूडमध्ये स्वतःची खास जागा बनवली आहे. तसेच त्याच्या दोन्ही पत्नी अमृता सिंह आणि करीना कपूर सुद्धा अभिनय क्षेत्रात आहेत. आज सैफच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या या 5 खास गोष्टी...

तैमुर सैफला ‘पापा’ नाही तर या नावानं हाक मारतो

सैफनं एकदा सांगितलं होतं की तैमुर आता बोलायला शिकत आहे. त्यानं सांगितलं तैमुर आता हाय, पाणी, अब्बा सारखे शब्द बोलायला शिकत आहे. त्याचवेळी त्यानं खुलासा केला होता की, तैमुर त्याला पापा नाही तर ‘सर’ म्हणून हाक मारतो. मात्र यामागचं कारण त्यानं स्पष्ट केलं नव्हतं.

'ये रे ये रे पैसा 2' या मराठी सिनेमाला थिएटर्स मिळत नसल्यानं प्रसाद ओक संतापला

लग्नाआधी करीनानं सैफला घातली होती ‘ही’ एक अट

करीनानं अनेक मुलाखतींमध्ये ही गोष्ट सांगितली आहे की, तिनं लग्नाआधी सैफला एक अट घातली होती आणि सैफनं तिची ती अट मान्यही केली होती. ही अट अशी होती की, मी तुझी पत्नी आहे पण लग्नानंतरही मी काम करणार आणि पैसे कमवणार आणि यात तु मला आयुष्यभार पाठिंबा देशील.

अनुष्का शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल प्रभास म्हणतो, आम्ही दोघंही...

करीनाशी लग्न करण्याआधी सैफनं अमृताला लिहिली होतं पत्र...

मागच्या वर्षी सैफनं मुलगी सारासोबत करण जोहरच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यानं सांगितलं की, करीनाशी लग्न करण्याआधी त्यानं पहिली पत्नी अमृता सिंहला पत्र लिहिलं होतं. सैफनं सांगितलं, ‘या मेसेजमध्ये मी पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा मागत दोघांनीही आपापल्या जीवनात पुढे जावं असं म्हटलं होतं. मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचं अमृताला सांगितलं होतं. तसेच तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर हे पत्र मी करीनाला दाखवलं होतं तिनं ते पूर्ण वाचलं आणि अमृताला पाठवायला सांगितलं. करीनानं मला नेहमीच पाठिंबा दिला.

जेव्हा सैफ म्हणाला होता की माझंही शोषण झालं आहे...

सैफ अली खाननं मी टू अभियानाच्या वेळी या गोष्टीचा खुलासा केला होता. तो म्हणला, अनेक लोक दुसऱ्यांना समजून घेत नाहीत. दुसऱ्या व्यक्तीचं दुःख समजणं खूप कठिण असतं. मात्र मला याविषयी बोलायचं नाही. आज मी महत्त्वाचा नाही आहे. पण मी जेव्हा माझ्यासोबत काय झालं होतं हे आठवतो तेव्हा मला खूप राग येतो. आज आपण महिलांची काळजी घ्यायला हवी.

VIRAL VIDEO : हॅलो! अक्षय कुमारनं उचलला पत्रकाराचा फोन आणि...

कोणाचीही हिंमत नाही की माझ्या घरात महिलांवर अत्याचार करेल

सैफ म्हणतो या समाजात खूप असमानता आहे. पण मला नाही वाटत की माझ्या कुटुंबीयांशी कोणी बेशिस्तपणे वागावं. मला नाही माहित मला कय जाणवतं. पण माझी आई असो, बहीण असो किंवा पत्नी. माझ्या घरातील कोणत्याही व्यक्तीची त्यांच्याशी बेशिस्तपणे वागण्याची हिंमत होणार नाही.

======================================================================

भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारी रेड्यांची झुंज, पाहा हा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: August 16, 2019, 9:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading