मुंबई, 15 ऑगस्ट : बॉलिवूड सिनेमाप्रमाणेच मराठी सिनेमांनीही आता स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हिंदी प्रमाणेच आता मराठीमध्येही सामाजिक विषयांवर भाष्य करणारे सिनेमा सध्या तयार होत आहेत. मात्र अनेकदा चांगली कथा आणि आशय असतानाही या सिनेमाना थिएटर्स मिळत नसल्यानं मराठी सिनेसृष्टीतून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून हिंदी सिनेमा रिलीज झाल्यानंतर मराठी सिनेमांना मात्र थिएटर मिळणं कठीण जाताना दिसतं. त्यासाठी निर्मात अमेय खोपकर मागची अनेक वर्ष झगडत आहेत. मात्र याचं प्रमाण अद्याप कमी झालेलं नाही. त्यामुळे परिस्थितीवर अभिनेता प्रसाद ओकनं संताप व्यक्त केला आहे. प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेय खोपकर यांची निर्मिती असलेला ‘ये रे ये रे पावसा 2’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमानं पहिल्या आठवड्यात चांगली कमाईसुद्धा केली मात्र या आठवड्यात सिनेमाला स्क्रीन मिळण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकारावर प्रसाद ओकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. प्रसादनं या विषयीची एक पोस्ट त्याच्या फेसबुकवर शेअर केली आहे.
अनुष्का शेट्टीसोबतच्या नात्याबद्दल प्रभास म्हणतो, आम्ही दोघंही…
प्रसादनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, ‘सरकारला कधी जाग येणार??? भारताच्या स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातूनचं मराठी चित्रपटसृष्टीचं स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखं वाटतंय… ‘ये रे ये रे पैसा2’ हा सिनेमा गेल्या आठवड्यात रिलीज झाला. या सिनमानं चांगली कमाई करूनही या आठवड्यात या सिनेमाला थिएटर्ससाठी झगडावं लागत आहे. कारण दोन हिंदी सिनेमा या आठवड्यात रिलीज झाले आहेत. ही मराठी सिनेमांची महाराष्ट्रातील अवस्था आहे आणि जर हे असचं चालू राहिलं तर मराठी निर्मात्यांनी पैसे कमवायचे तरी कसे. अमेय खोपकर मागच्या 12 वर्षांपासून मराठी सिनेमांना न्याय मिळवून देण्यासाठी झटत आहेत. त्यांनी अनेक सिनेमांना थिएटर्स मिळवून दिले आहेत. मात्र आता त्यांचा स्वतःचा हा सिनेमा असल्यानं त्यासाठी भांडणं त्यांच्या तत्त्वात बसत नाही. पण आता वेळ आली आहे. आपण म्हणजे मराठी सिनेसृष्टीनं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे.’
याड लागलं! भूमि पेडणेकर बॉलिवूडच्या या हिरोला करतेय डेट?
मराठी सिनेमांना थिएटर्सना थिएटर्स मिळत नसल्याची ही पहिलीच वेळ नाही याआधीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सिनेमाच्या बजेटचा पैसा कसा उभा करायची याची समस्या निर्मात्यांसमोर उभी राहते. याआधीही अनेक मराठी कलाकारांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं हृदयविकारानं निधन
===================================================================================== SPECIAL REPORT : मिकाला तो परफॉर्मन्स पडला भारी, गाण्यावर भारतात आली बंदी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







