मुंबई, 15 ऑगस्ट : अभिनेता अक्षय कुमार त्याच्या सिनेमासोबतच प्रॅन्कसाठीही प्रसिद्ध आहे. सेटवरील त्याच्या प्रॅन्कचे अनेक किस्से बॉलिवूड सेलिब्रिटींना ऐकवले आहेत. मात्र यावेळी अक्षयच्या प्रॅन्कची शिकार एक पत्रकार ठरला. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये असं काही होईल याची कल्पना कोणालाही नव्हती. सध्या अक्षय कुमार मिशन मंगलच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मात्र त्यावेळी असं काही झालं की उपस्थित असेलेल्या सर्वांनाच हसू आवरणं कठिण झालं. या इव्हेंटमधील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
मिशन मंगलच्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये अक्षय कुमार आणि त्याच्या को-स्टार्स तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हारी आणि नित्या मेनन हे सर्व बोलत असताना समोरच एका पत्रकाराचा फोन वाजला. तापसीच्या सांगण्यावरून अक्षय तो कॉल रिसिव्ह करतो आणि बोलू लागतो. ‘हॅलो कृष्णाजी, आम्ही एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आहोत. मी अक्षय कुमार बोलत आहे आणि या फोनचा मालक तुम्हाला नंतर फोन करेल. असं बोलून अक्षय फोन ठेऊन देतो. प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी साउंड बाइट रेकॉर्ड करण्यासाठी हा फोन त्याठीकाणी ठेवण्यात आला होता. मात्र कोणाला वाटलंही नव्हतं की हा पत्रकार अशाप्रकारे अक्षय कुमारच्या प्रॅन्कची शिकार बनेल.
'दिवसातून 10 वेळा रडायचे मी' ... बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रीनं सांगितलं सत्य
अक्षयचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि त्याला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. पण असं करणारा अक्षय कुमार पहिलाच अभिनेता नाही. याआधी फिलौरी सिनेमाच्या प्रमोशनच्यावेळी अभिनेत्री अनुष्का शर्मानंही असंच केलं होतं. अनुष्कानं अशाप्रकारे पत्रकाराचा कॉल रिसिव्ह करून बोलायला सुरुवात केली त्यावेळी गायक दिलदीत दोसांझ सुद्धा तिच्यासोबत होता.
पाकिस्तानात गाणाऱ्या मीका सिंगला दणका; भारतात घालण्यात आली बंदी!
अक्षयचा ‘मिशन मंगल’ मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. अक्षय व्यतिरिक्त या सिनेमामध्ये 5 अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमात इस्रो वैज्ञानिकांच्या मेहनतीची कथा साकारण्यात आली आहे. एक रॉकेट अंतराळात पाठवण्यासाठी कशापद्धतीनं तयारी केली जाते याचं चित्रण या सिनेमात करण्यात आलं आहे. अंतराळ यान मंगळ ग्रहावर पाठवणं हे भारतासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. प्रक्षेपणाचा फार काही अनुभव नसतानाही नासाच्या मदतीवर अवलंबून न राहता आणि सर्व बाजूंनी फक्त नकार मिळत असतानाही हार न मानता मिशन मंगल यशस्वी करून दाखवणाऱ्या या वैज्ञानिकांची मेहनत दाखवण्यात आली आहे.
'बधाई हो'च्या दादींना मागच्या 10 महिन्यापासून आहे 'हा' गंभीर आजार
=======================================================
SPECIAL REPORT : पुरातले 'हे' असे देवदूत, ज्यांनी वाचवला अनेकांचा जीव
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा