काही दिवसांपूर्वी प्रभास आणि अनुष्का त्यांच्या नात्याबाबत सध्या गंभीर असून हे दोघंही या नात्याला पुढे नेण्याचा विचार करत आहेत असं म्हटलं जात होतं. एवढंच नव्हे तर अनुष्का आणि प्रभासनं लॉस एंजेलिसमध्ये घर घेण्याच्या विचारत असल्याच्याही चर्चा होत्या. मात्र त्यावेळी प्रभास किंवा अनुष्काकडून याबाबत कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नव्हतं. याशिवाय साहो सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी प्रभासला दुखापत झाली होती. त्यानंतर अनुष्कानं सेटवर जाऊन त्याची भेट घेत असे स्टंट करताना डबल बॉडीचा वापर करण्याचा सल्ला त्याला दिला होता. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याचा प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. हा सिनेमा सुरुवातीला 15 ऑगस्टला रिलीज होणार होता मात्र नंतर त्याची रिलीज डेट बदलण्यात आली. त्यामुळे आता हा सिनेमा येत्या 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. साहोचे दिग्दर्शक सुजीत यांनी या सिनेमातील सर्व स्टंट सीनसाठी खास मेहनत घेतली आहे. या सिनेमातील अनेक सीन्स हे हॉलिवूडच्याही स्टंटना सुद्धा मागे टाकताना दिसतात. प्रभासनंही या सर्व अॅक्शन सीन्स खूप मेहनत घेतली असून त्यानं सिनेमामधील त्याच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूर या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय नील नितिन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर यांच्यासारखे दिग्गज अभिनेते खलनायकांच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच प्रकाश बेलावडी, मंदिरा बेदी आणि मुरली शर्मा यांच्याही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. =================================================================== SPECIAL REPORT : मिकाला तो परफॉर्मन्स पडला भारी, गाण्यावर भारतात आली बंदी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.