यानंतर पीएम केअर फंडमध्ये का डोनेट केले नाहीत, असा सवाल त्यांना सोशल मीडियावर विचारण्यात आला होता. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी अभिनेत्री सारा अली खान हिने पीएम केअर फंडमध्ये पैसे दान दिले होते. मात्र सैफ आणि करीनाने इतर संस्थांना मदत कण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. (हे वाचा-राम गोपाल वर्माच्या 'कोरोना पॉझिटिव्ह' असल्याच्या ट्वीटनंतर युजर्सचा संताप) करीनाने काही वेळापूर्वी केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, ते आता पीएम केअर फंडमध्ये देखील त्यांचं सहकार्य करणार आहेत. तिने असं म्हटलं आहे की, 'आम्ही पीएम केअर फंड आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सहकार्य करणार आहोत. अशा परिस्थितीत पुढे केलेला प्रत्येक हात आणि देण्यात आलेला एक-एक रुपया महत्त्वाचा आहे. शक्य असेल तिथे मदत करा. करीना, सैफ आणि तैमुर.'View this post on Instagram
काही जणांनी सैफ-करीनाला ट्रोल केले असले तरीही त्यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केले आहे. करीना कपूरने पीएम केअर फंडमध्ये सुद्धा दान करून ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाबाबत सोशल मीडियामार्फत जागरूकता पसरवण्याचं कामही करीना करत आहे. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर आलेली करीना कपूर खान त्यावर खूप सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Saif Ali Khan, Taimur ali khan