मुंबई, 02 एप्रिल : देशाता कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. देशभरातील उद्योगपती, बॉलिवूड कलाकार, मराठी कलाकार कोरोनाशी लढण्यासाठी मदत करत आहेत. कोट्यवधी रुपयांची मदत करत सरकार आणि देशाला कोरोनाशी लढण्यासाठी बळ देत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने देखील कोरोनाविरोधातील या लढाईत मोठी मदत केली आहे. त्याने 25 कोटी रुपये पीएम केअर फंडमध्ये (PM Care Fund) दान केले आहेत. यावरून त्याचं सर्वच स्तरामध्ये कौतुक होत आहे. त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने देखील सोशल मीडियावर व्यक्त होत त्याचं कौतुक केलं आहे. मात्र नुकतीच ट्विंकलने केलेली इन्स्टाग्रामवरील पोस्ट वाचून तुम्ही नक्की हैराण व्हाल. देशात जी परिस्थिती आहे, त्याची भविष्यवाणी ट्विंकलने याआधीच 2015 मध्ये केली होती.
(हे वाचा-आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद झाल्यानंतर लंडनमध्ये अडकली होती जुही, अशी परतली भारतात)
ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) नेहमीच सोशल मीडियावर तिचे विचार मांडत आहे. 2015 मध्येच ट्विंकल खन्नाने एक स्क्रिप्ट लिहिली होती, ज्यामध्ये देशातील आजच्या परिस्थितीचं वर्णन केलं होत, त्यामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. ती म्हणतेय की ही स्क्रीप्ट तिने काही वर्षांपूर्वी तिचे एडिटर चिकी सरकार आणि जगरनॉट डॉट इन यांना दाखवली होती. मात्र त्यात ह्युमर नसल्याच कारण देत त्यांनी ती नाकारली होती. त्यामुळे 'आता कोण हसत आहे' असा उपहासात्मक प्रश्न ट्विंकलने विचारला आहे.
बॉलिवूडला अलविदा केल्यानंतर ट्विंकलने लिखाणावर आणि इंटेरिअर डिझायनिंगवर जास्त भर दिला आहे. आपले विचार स्पष्टपणे मांडणाऱ्या लेखकांपैकी ट्विंकल एक आहे. तिची काही पुस्तक देशातील 'बेस्ट सेलर' देखील आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Twinkle khanna