मुंबई, 11 जुलै- तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांच्या आगामी सांड की आंख सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. आजीच्या भूमिकेत तापसी आणि भूमी फार दमदार दिसत आहेत. असं पहिल्यांदा होणार आहे की या दोन्ही अभिनेत्री मोठ्या पडद्यावर वयस्कर महिलांच्या भूमिका साकारणार आहे. सिनेमात दोन आजींची गोष्ट दाखवण्यात आली आहेत, ज्या उत्कृष्ट नेमबाजी करतात. 1 मिनिट आणि 23 सेकंदांच्या या टीझरची सुरुवात एका लहान मुलीच्या आवाजाने होते. यात ती बोलते की, 'आतापर्यंत आपण आज्यांकडून गोष्टी ऐकत आलो आहोत. पण आज मी तुम्हाला माझ्या आजींची गोष्ट सांगणार आहे. चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर.' यानंतर सुरू होते की आजींच्या संघर्षाची कथा.
भूमीने 87 वर्षीय चंद्रो तोमरची तर तापसीने 82 वर्षीय प्रकाशी तोमरची व्यक्तिरेखा सिनेमात साकारली आहे. खऱ्या आयुष्यात चंद्रा आणि प्रकाशी तोमर यांनी वयाच्या 65 नंतर नेमबाजीनंतर 30 हून जास्त राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकल्या. सर्व संकटांचा सामना करत दोघींनी नेमबाजीत 352 पदकं जिंकली. तापसीने इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करताना लिहिले की, ‘ही तर फक्त सुरुवात आहे.. कारण शरीर म्हातारं होतं पण मन होत नाही.’
टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की, तापसी आणि भूमी या अशा गावात राहत असतात जिथे आजही महिलांना डोक्यावरून पदर सरकवण्याची परवानगी नाही. पण या सर्व गोष्टींवर मात करून त्या नेमबाजी करतात आणि सांड की आंखवर चोख निशाणा लावतात. सिनेमाचा टीझर फार दमदार असून प्रेक्षकांना आता ट्रेलरची उत्सुकता लागली आहे. विशेष म्हणजे या सिनेमाची कथा चंद्रो आणि प्रकाशी तोमर या दोन आजींच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे.
तापसी आणि भूमीच्या लुकमुळे याआधीच हा सिनेमा चर्चेत आला होता. दोघींना त्यांच्या लुकमुळे ट्रोलही केलं गेलं होतं. अनुराग कश्यपने या सिनेमाची निर्मिती केली असून तुषार हीरानंनदानी यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा स्वीकारली आहे. येत्या दिवाळीत अर्थात 25 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्रीसोबत कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तवणूक, शिव्या देऊन गाडीतून उतरवलं
‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताला ट्रेकदरम्यान आला पॅनिक अटॅक, शेअर केला जीवघेणा
बिग बी नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म
गटारात पडलेल्या चिमुकल्याचा शोध सुरू; मनपाच्या अधिकाऱ्यांची मिठाची
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा