अमिताभ बच्चन नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म

अमिताभ बच्चन नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म

यशाच्या शिखरावर असल्यामुळे त्याच्या डोक्यात याच गोष्टीची हवा गेली आणि त्याने नवोदित अभिनेत्रीसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै- बॉलिवूडमध्ये 80 च्या दशकात लवर बॉय या नावाने प्रसिद्ध असलेल्या कुमार गौरवचा जन्म 11 जुलै 1960 मध्ये लखनऊ येथे झाला. गौरवचं खरं नाव मनोज तुली होतं. कुमार गौरवच्या वडील राजेंद्र कुमार हे 60 आणि 70 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. राजेंद्र यांचा 1999 मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला.

कुमारने 1981 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर लव स्टोरी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पहिला सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर कुमार एका रात्रीत स्टार झाला होता. मात्र यश मिळवणं सोप्पं असलं तरी ते यश टिकवणं सर्वात कठीण असतं. असंच काहीसं कुमार गौरवच्या बाबतीत झालं. यशाच्या शिखरावर असलेल्या कुमारच्या डोक्यात याच गोष्टीची हवा गेली आणि त्याने नवोदित अभिनेत्रीसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

पहिल्या सिनेमानंतर निर्माते दिनेश बंसन यांनी शिरीन फरहाद या सिनेमासाठी नवीन अभिनेत्री यास्मीनला साइन केले होते. कुमारला ही गोष्ट जेव्हा कळली तेव्हा त्याने नवोदित अभिनेत्रीसोबत काम करण्यास नकार दिला. दिनेश यांनी कुमार गौरवला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कोणाचेच ऐकलं नाही.

जवळपास 4 वर्षांनंतर राज कपूर यांनी राम तेरी गंगा मैली या सिनेमाच्या अभिनेत्रीसाठी ऑडिशन घ्यायला सुरुवात केली राज कपूर यांनी या सिनेमासाठी यास्मीनची निवड करत तिचं मंदाकिनी असं नामकरण केलं. सिनेमा हिट झाला आणि मंदाकिनी एका रात्रीत स्टार झाली. एक वेळ अशीही आली जेव्हा कुमार गौरवसोबत काम करायला कोणतीच अभिनेत्री तयार होत नव्हती. दरम्यान, एका सिनेमासाठी कुमारने निर्मात्यांना मंदाकिनीचं नाव सुचवलं होतं. पण यावेळी मंदाकिनीनेच कुमार गौरवसोबत काम करायला नकार दिला. मंदाकिनीकडे तेव्हा बड्या स्टार आणि निर्मात्यांचे सिनेमे असल्यामुळे तिला कुमार गौरवसोबत काम करायचं नव्हतं.

दरम्यान, कुमार गौरवच्या दुसऱ्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला. सिया ही डिझायनर असून तिने आदित्य उदानीशी साखरपुडा केला. आदित्यचं कुटुंब गार्मेन्ट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात आहेत. यावेळी नम्रता दत्तचा भाऊ संजय दत्त सुट्ट्यांसाठी परदेशात गेल्यामुळे तो साखरपुड्याला उपस्थित राहू शकला नाही. कुमार गौरवची मोठी मुलगी साचीच्या लग्नातही संजय उपस्थित राहू शकला नव्हता. कारण साचीच्या लग्नावेळी संजय तुरुंगात होता. साचीने कमाल अमरोही यांच्या नातवाशी बिलाल अमरोहीशी लग्न केलं आहे. कुमार गौरव एवढा प्रसिद्ध अभिनेता होता की जर तो अजून काही काळ सिनेसृष्टीत टिकला असता तर बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यानंतर दुसरा सुपरस्टार झाला असता.

'या' गंभीर आजाराशी लढतेय ही अभिनेत्री, लाइमलाइटपासून राहायला लागली दूर

ढसाढसा रडत प्रिन्स नरुलाने सांगितलं कसा झाला भावाचा मृत्यू

टीव्ही अभिनेत्रीने केलं तिसरं लग्न, या कारणामुळे झाले फोटो व्हायरल

 

First published: July 11, 2019, 9:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading