Bigg Boss Marathi 2- KVR ग्रुप फुटणार? किशोरी, वीणा, .. मधला वाद असा आला चव्हाट्यावर

Bigg Boss Marathi 2- KVR ग्रुप फुटणार? किशोरी, वीणा, .. मधला वाद असा आला चव्हाट्यावर

बिग बॉस मराठीच्या घरात सर्वात जास्त चर्चा कोणाची होत असेल तर तो केव्हीआर ग्रुप. पण आता या ग्रुपमधील भांडण संपता संपत नाहीये.

  • Share this:

मुंबई, 10 जुलै- बिग बॉस मराठीच्या घरात सर्वात जास्त चर्चा कोणाची होत असेल तर तो केव्हीआर ग्रुप. पण आता या ग्रुपमधील भांडण संपता संपत नाहीये. एक मुद्दा झाला की दुसरा आणि तिसरा मुद्दा डोकं वर काढतो. त्यामुळे घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षकांना वीणा, रुपाली आणि किशोरीताई या तिघींच्या मनामध्ये नक्की काय आहे हेच कळत नाहीये. नक्की तिघींमध्ये कोणते गैरसमज आहेत आणि कोणत्या कारणावरून त्या एकमेकींवर नाराज आहेत याबद्दल प्रश्नचिन्ह आहे.

कधी वीणाचं रुपालीसोबत भांडण होतं तर कधी किशोरीताईसोबत. कधी रुपाली वीणावर नाराज होते तर कधी किशोरीताई वर. एवढंच नाही तर कधी किशोरीताई वीणा आणि रुपालीमधील गैरसमज दूर करतात तर कधी रुपाली किशोरी आणि वीणामधील, यामध्येच आठवडे संपत आहेत... कधी ग्रुप आहे आणि ग्रुप होऊनच खेळणार असे म्हणतात तर कधी वैयक्तिक खेळत आहेत असेही म्हणतात. मी आता माझ्याबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या सदस्यांशी बोलत आहे, असा स्टॅड किशोरी यांनी घेतला. कालच माधवशी चर्चा करताना त्या मला खूप फ्री झाल्यासारखं वाटतं असल्याचं म्हणाल्या.

जर मला तिकीट मिळालं नाही तर तुलाही देणार नाही, दोघीही नॉमिनेट होऊ- वीणा जगताप

आज देखील या तिघींमध्ये होणाऱ्या चर्चेचा विषय तोच आहे. रुपाली वीणा आणि किशोरी यांना म्हणते की, आज जे मी गाणं म्हटलं ते म्हणूनच होतं की, अजूनही मला कुठेतरी वाटतं की आपण तिघी एकत्र आहोत, यावर किशोरी ताई म्हणाल्या की, मला दुहेरी वागायला जमत नाही. मी एकमार्गीच वागते. कधी एक बोलायचं कधी दुसर बोलायचं यामध्ये मला अडकायचे नाही. त्यावर वीणा म्हणाली असे कोणीच करत नाही. रुपाली बोलताना म्हणाली, पंचिंग बॅगवाला जो टास्क होता त्यावर तुझा फोटो लावला कारण मला तुझ्याशी बोलताच येत नाही, तुला काही सांगता येत नाही, तुला समजवता येत नाही. यावर किशोरीताई म्हणाल्या की, मी नेहेमीच गप्प असते तुम्ही दोघीच बोलत असता.

ढसाढसा रडत प्रिन्स नरुलाने सांगितलं कसा झाला भावाचा मृत्यू

रुपाली म्हणाली हे तू सगळ्यांनाच सांगितले आहे. यानंतर वादाला सुरुवात झाली. रुपालीच्या या आरोपावर किशोरी म्हणाल्या की, मला सांगायची गरज नाही. त्यावर रुपाली म्हणाली हे तू हिनाला सांगितलं माझ्यासमोर आणि वीणा म्हणाली, किशोरीताई अस देखील म्हणाली, कर्म आहे, सगळ्यांचे कर्म इथेच फिटतील, इथून जाण्याच्या आधी सगळे भोगून जातील. त्यावर किशोरीताई म्हणाल्या “शिवला तू म्हणालीस की मी स्वत:च्या डोक्याने नाही खेळत, तुम्ही दोघी माझ्यामागे बोलता. त्यावर दोघींचे म्हणणे होते मागे नाही समोर बोललो आम्ही. हे आरोप प्रत्यारोप सुरुच असताना किशोरी तिथून मध्येच उठून जातात. आता पुढे या दोघींचे काय म्हणणे आहे.. हे सगळ कसं आणि कधी मिटेल.. हा प्रश्नच आहे.

Batla House Trailer: ‘हमारे 17 करोड मुसलमानों को पढना नही आता?’

SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?

First published: July 10, 2019, 8:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading