जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेशने जिनिलियासाठी घेतला हटके उखाणा; ऐकून तुम्हीही म्हणाल वाह्ह्

Riteish Deshmukh: मराठमोळ्या रितेशने जिनिलियासाठी घेतला हटके उखाणा; ऐकून तुम्हीही म्हणाल वाह्ह्

रितेश जेनेलिया

रितेश जेनेलिया

बॉलिवूडमधील सर्वात गोड जोडप्यांपैकी एक अशी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखची ओळख आहे. या जोडीला सिने इंडस्ट्रीमध्ये नुकतंच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान रितेश आणि जिनिलिया ‘वेड’ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 5 जानेवारी- बॉलिवूडमधील सर्वात गोड जोडप्यांपैकी एक अशी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख ची ओळख आहे. या जोडीला सिने इंडस्ट्रीमध्ये नुकतंच 20  वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान रितेश आणि जिनिलिया ‘वेड’ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. वेड चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात भरघोस कामे करत सर्वांनाच वेड लावलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जिनिलिया मराठीत अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. यादी तिने ‘लै भारी’मध्ये कम्युऑ केला होता. गेल्या काही दिवसांपासून रितेश आणि जिनिलिया आपल्या वेड या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. त्यांनतर आता दोघेही वेडच्या यशाचं सेलिब्रेशन करत आहेत. या दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता रितेश देशमुखचा आणि जिनिलियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये रितेश मराठीमध्ये चक्क उखाणा घेताना दिसून येत आहे. नुकतंच जिनिलिया आणि रितेशने एका वेबसाईटला मुलाखत दिली होती. यावेळी त्याला हा उखाणा घेण्यास सांगण्यात आलं होतं. (हे वाचा: शुक्रवार 2.25, शनिवारी 3.25, रविवारी 4.50, सोमवारी 3.02 कोटी; रितेशचं न संपणारं ‘वेड’ **)** रितेश आणि जिनिलियाची जोडी प्रचंड पसंत केली जाते. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना फारच पसंत पडते. या दोघांनी आपल्या केमिस्ट्रीच्या माध्यमातून प्रेक्षकांना वेड लावलं आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत रितेशला मराठीत एक उखाणा घेण्यास संगणयत आलं होतं. यावेळी त्याने खास जिनिलियासाठी उखाणा घेत म्हटलं, ‘मेथीत भाजी मेथीची जिनिलिया माझ्या प्रीतीची’. सध्या रितेशच्या या उखाण्याची जोरदार चर्चा होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वेड बॉक्स ऑफिस कलेक्शन- सिनेमा क्रिटिक तरण आदर्शनं केलेल्या ट्विटनुसार, वेड सिनेमानं पहिल्या दिवशी म्हणजेच ओपनिंग डेला 2.5 करोडची कमाई केली होती. मराठी सिनेमांमध्ये वेडनं सिनेमानं ओपनिंग डे कमाईमध्ये पाचवा क्रमांक मिळवला. वेडनं दुसऱ्या दिवशी म्हणजे 31च्या दिवशी शनिवारी 3.25 करोडची कमाई केली. नव्या वर्षात रविवारी 1 जानेवारी 2023ला सिनेमानं सर्वाधिक 4.50 करोडची कमाई केली. तर सोमवारी 2 जानेवारीला 3.02 करोडची कमाई केली. सिनेमानं पहिल्या आठवड्यात एकूण 13.02 करोडचा गल्ला जमावला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात