सध्या लग्न सराईचा माहोल आहे. तुळशीची लग्न झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात झाली. सर्वसामान्यांपासून ते अगदी अनेक सेलिब्रिटी देखील लग्नबंधनात अडकले आहेत. लग्न म्हटलं की मराठी उखाणे तर येणारच. मग तो नवरदेव असोत किंवा नववधू. दोघांनाही नाव घ्यावेच लागते. त्याशिवाय नातेवाईक किंवा मित्रमंडळी सोडत नाहीत. मग उखाणा काय घ्यायचा हा गहण प्रश्न उभा राहातो. त्यात काही लोक नववधू-नवरदेवाल उखाणे सुचवतात देखील. पण ते सगळे तेच-तेच म्हणजेच झालेले उखाणे असतात. आताची पिढी थोडी बदलली आहे. मग त्यांच्यासाठी मॉर्डन उखाणा घेणं गरजेचं आहे. मग अशावेळी उखाणा कुठून आणायचा? काळजी करु नका आम्ही असेच काही ट्रेंडिंग आणि मॉर्डन मराठी उखाणे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ते क्वचितच कोणाला माहित असतील. त्यामुळे तुम्ही जर ते उखाणे लग्नकार्यात घेतलेत, तर तुम्हाला वाहवा मिळू शकते. तसेच तुमचे भरभरुन कौतुक देखील होईल.
नवरा-नवरीसाठी खास मॉर्डन उखाणे...
1. कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
....चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
2. Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,
.....चं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka
3. लग्नात लागतात हार आणि तुरे,
... च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
4. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
... चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
5. वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
...रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
6. द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
... चे नाव घेतो ऐका देऊन कान
7.केसर दुथात टाकलं काजू,
बदाम, जायफळ,
..... चं नाव घेतो,
वेळ न घालवता वायफळ.
8. अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
…… रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना
9. गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, …… रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
10. लग्नात लागतात हार आणि तुरे, …… चे नाव घेण्याचा आग्रह आता पुरे.
11. इंग्रजीत म्हणतात मून, …… चं नाव घेते …… ची सून.
12. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …… चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
13. कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …… चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.
14. तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
……रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरूवात
15. एक होती चिऊ, एक होता काऊ, …… चे नाव घेतो डोक नका खाऊ.
16. संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, …… चे नाव घेतो सर्वजण ऐका.
17.रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
…… रावांना भरविते मी प्रेमाचा घास
18. आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, …… चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.
19. आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, …… चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.
20. रोज …… म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…
मग उखाणा घेताना ……, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?
21. आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,
……रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.
22.हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस;
…… रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस
23. मुरेल तितका होतो Tasty, प्रेमाचा मुरांबा…
…… चिडते तेव्हा भासते, ditto जगदंबा
24. पाहताच……ला, जीव झाला येडापीसा…
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा
25. गाडीत गाडी डेक्कन क्वीन……
……आहे, सेल्फी क्वीन
26. उटी, बंगलोर, म्हैसूर, म्हणशील तिथे जाऊ,
…… तुला भरवितो घास पण बोट नको चाऊ
27. चंद्र मराठीत, चाँद हिंदीत , इंग्रजीत म्हणतात मून
…… रावांचे नाव घेते मी …… सून
28. पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
....रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता
29. सासरची छाया, माहेरची माया.
....आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया
30. शिंपल्यात सापडले माणिक मोती,
....रावांच्या जीवनात झाले मी सारथी
मग तुमचा लग्नसोहळा उखाणा असो वा मंगळागौरी किंवा सत्यनारायण पूजेसाठी असो किंवा पहिला संक्रांत सणासाठी उखाणा असो. प्रत्येक शुभकार्याला घेण्यासाठी हे सुंदर आणि सोपे उखाणे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Social media, Top trending, Ukhane, Viral