मुंबई, 18 मे : लाखो तरुणांच्या मनावर राज्य करणारी मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लॉकडाऊनमुळे तिच्या मूळ गावी अकलूजला अडकली आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी सातत्यानं संवाद साधताना दिसते. सैराट सिनेमानंतर रिंकूला एका मागोमाग एक सिनेमांच्या ऑफर मिळत गेल्या आणि त्यात तिच्या अभिनयाचं कौतुकही झालं. लवकरच रिंकू बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. झुंड सिनेमात हे दोघं एकत्र दिसणार आहेत. मात्र बिग बींसोबत काम करण्यापेक्षा रिंकूला दुसरीच एक गोष्ट महत्त्वाची वाटत आहे. रिंकू राजगुरुनं 2016 मध्ये रिलीज झालेल्या नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यानंतर कागर, मेकअप या सिनेमांमध्ये ती दिसली. आता लवकरच ती नागराज मंजुळे यांच्या अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या काही भागांचं शूटिंग अद्याप बाकी आहे मात्र अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणार या आनंदापेक्षा रिंकूसाठी तिचं शिक्षण सर्वात जास्त महत्त्वाचं वाटत आहे. अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी कुटुंबासह 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, कोरोना टेस्ट…
रिंकूच्या करिअरचा आलेख दिवसेंदिवस वर जात असला तरीही तिला सर्वांत आधी आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे. याबद्दल बोलताना रिंकू म्हणाली, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करतेय याचा मला आनंदच आहे. पण नवी कामं सुरू करण्याआधी मी माझं शिक्षण पूर्ण करावं असं माझ्या आई-वडीलांना वाटतं. आता लॉकडाऊनमुळे परिक्षा लांबणीवर पडल्यानं मला त्यांची काळजी आहे. या आधीही सिनेमाचं शूट अर्धवट सोडून रिंकूनं दहावीची परिक्षा दिली होती. ‘फँड्री’मधल्या जब्याची ‘शालू’ आता झालीय एवढी मॉडर्न, PHOTOS पाहून व्हाल थक्क
रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वीच तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेली ‘हंड्रेड डेज’ ही वेब सीरिज रिलीज झाली. ज्यात रिंकूनं कमालीचा अभिनय केला आहे. लारा दत्ताची मुख्य भूमिका असतानाही रिंकूनं साकारलेली नेत्रा पाटील या मराठमोळ्या मुलीची भूमिका भाव खाऊन गेली. या वेब सीरिजमधील रिंकूच्या अभिनयाचं खूप कौतुकही केलं गेलं. सध्या लॉकडाऊनमध्ये रिंकू घरी राहून तिच्या फॅमिलीला वेळ देत आहे. चार वर्षं गंभीर आजारशी लढत होती सुश्मिता सेन, आता केला धक्कादायक खुलासा