जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / चार वर्षं गंभीर आजारशी लढत होती सुश्मिता सेन, आता केला धक्कादायक खुलासा

चार वर्षं गंभीर आजारशी लढत होती सुश्मिता सेन, आता केला धक्कादायक खुलासा

चार वर्षं गंभीर आजारशी लढत होती सुश्मिता सेन, आता केला धक्कादायक खुलासा

सध्या सुश्मिताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिनं तिच्या आजारपणाचा खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मे : बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन मागच्या बऱ्याच काळापासून सिनेमांपासून दूर आहे. एकेकाळी आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मात्र मोठा चाहता वर्ग आहे. सुश्मिता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सतत तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना प्रेरणा देत असते. पण सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तिनं तिच्या आजारपणाचा खुलासा केला आहे. या व्हिडीओमध्ये सुश्मितानं स्वतः खुलासा केला आहे की 6 वर्षांपूर्वी ती एडिसन नावाच्या आजाराचा सामना करत होती. सुश्मितानं तिच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती नन चाकसोबत वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत तिनं एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे. ज्यात तिनं तिला झालेल्या या आजाराविषयी सांगितलं आहे. एडिसन हा एक असा आजार आहे ज्यामुळे माणसाची इम्युनिटी सिस्टीम अर्थात रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते. कुत्रा चावल्यानं बिघडला अभिनेत्रीचा चेहरा! म्हणाली, आता माझं आयुष्य कधीच… सुश्मितानं या पोस्टमध्ये लिहिलं, मला सप्टेंबर 2014 मध्ये एका ऑटो इम्युनशी संबंधीत आजाराबद्दल समजलं. ज्याचं नाव होतं एडिसन. ज्याने मला जाणीव करून दिली की मी आता कोणतीच लढाई लढू शकत नाही. एक थकलेलं शरीर ज्यात प्रचंड निराशा आणि आक्रमकता भरलेली आहे. माझ्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं आली होती. मी त्या काळाबद्दल काही सांगू शकत नाही जेव्हा मी यातून बाहेर पडण्यासाठी 4 वर्षं झुंजत होते.

सुश्मितानं पुढे लिहिलं, बऱ्या समस्यांना सामोरं गेल्यानंतर मी माझ्या मेंदूला मजबूत बनवलं आणि माझ्या शरीराला याच्याशी लढण्यासाठी तयार केलं. मी ‘ननचाक’वर लक्ष केंद्रित केलं. स्वतःच्या मनातली आक्रमकता बाहेर काढली. जवळपास 4 वर्ष मी या आजाराशी लढत राहिले आणि मग माझं दुःखच माझ्यासाठी एक कला ठरलं. 2019 पर्यंत मी पूर्णपणे ठीक झाले. माझे एड्रनल ग्लँड्स सक्रिय झाले. आता मला कोणतीच स्टेरॉयड किंवा ऑटो इम्यूनची समस्या नाही. मिलिंद सोमणनं शेअर केला 25 वर्षांपूर्वीचा वादग्रस्त Nude Photo, म्हणाला…

जाहिरात

आपल्या पोस्टमधून सुश्मितानं चाहत्यांना संदेश दिला आहे की, आपल्या स्वतः व्यतिरिक्त आपल्या शरिराला चांगल्या प्रकारे कोणीच ओळखू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या मनाचं ऐका. आपण सर्वच योद्धे आहोत म्हणून कधीच हार मानू नका. या पोस्टमध्ये तिनं तिची ट्रेनर नुपूर शिखरेचे या कठीण प्रसंगात साथ दिल्याबाबत आभार मानले आहेत. सुश्मिताची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. सलमानच्या नावानं फसवणूक करत होती महिला, अभिनेत्यानं केला पर्दाफाश

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात