2013 मध्ये दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फँड्री सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याची कथा अतिशय ग्रामीण भागातील होती आणि यातली शालूची भूमिका प्रचंड गाजली होती. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)
ही शालू म्हणजेच अभिनेत्री राजश्री खरात सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)
सोमनाथ अवघडे याने सिनेमात जब्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. तसेच या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले होते. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)
नागराज मंजुळे या सिनेमासाठी नायिकेचा शोध घेत होते तेव्हा त्यांना मनासारखी कोणी सापडत नव्हती आणि त्यावेळी त्यांनी राजश्री खरात पुण्यात पाहिलं. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)
नागराज यांना हीच मुलगी आपल्या सिनेमाची नायिका व्हावी असं वाटायचं पण ती कोण, कुठली याची काही माहिती नव्हती. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)
पण नागराज मंजुळेंनी तिला शोधून काढलं. पण सुरुवातीला राजश्रीच्या आई-वडीलांनी मुलीला सिनेमात काम करण्यास नकार दिला. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)
अखेर तिच्या आई-वडिलांना समजावल्यावर राजश्री अखेर या सिनेमाची नायिका झाली. संपूर्ण सिनेमात तिचा एकही डायलॉग नसतानाही प्रेक्षकांनी शालूची भूमिका डोक्यावर घेतली. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)
या सिनेमानंतर राजश्रीनं काही सिनेमात काम केलं. पण फँड्रीनं तिचं नशीब पालटलं. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)
सध्या इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळे राजश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेल्या राजश्रीचे इन्सटाग्रामवर 88 हजारांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (फोटो- राजश्री खरात इन्स्टाग्राम)