अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी कुटुंबासह 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, कोरोना टेस्ट...

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी कुटुंबासह 14 दिवसांसाठी क्वारंटाईन, कोरोना टेस्ट...

अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबाला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसशी लढत आहे. या व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं संपूर्ण देशभरात पुन्हा एका 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवलं आहे. पण अशा अनेक मजूर खाण्यापिण्याच्या आणि राहण्यासाठी जागा नसल्याच्या चिंतेनं आपापल्या घरी परतत आहेत. याशिवाय आपल्या कुटुंबापासून दूरावलेले अनेकजण आपल्या कुटुंबीयांना भेटू इच्छित आहेत. अशात बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईतून आपल्या गावी मुजफ्फरनगरला पोहोचला असल्याची माहिती समोर आली आहे. तिथे पोहोचल्यावर त्याला त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मात्र याबाबत नवाझकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

नवाझुद्दीन सिद्दीकीबद्दल काही मीडिया रिपोर्टनी असा दावा केला आहे की तो लॉकडाऊनच्या काळात मुंबईतून रवाना होत त्याच्या घरी मुजफ्फरनगरला पोहोचला आहे. नवाझ त्याची आई, भाऊ आणि वहिनी यांच्यासोबत 11 मे ला या ठिकाणी आला आहे असं बोललं जात आहे. याशिवाय असंही बोललं जात आहे की त्यानं यासाठी महाराष्ट्र सरकारचं परवानगी घेतली होती आणि रस्त्यांमार्गे तो त्याच्या घरी पोहचला. दरम्यान या प्रवासात त्याच्यासह त्याच्या कुटुंबाची थर्मल स्कॅनिंग आणि अन्य महत्त्वाच्या चाचण्या देखील करण्यात आल्या. तसेच घरी पोहोचल्यावर त्यांनी आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षेचा विचार करत स्वतःला क्वारंटाईन केलं आहे.

चार वर्षं गंभीर आजारशी लढत होती सुश्मिता सेन, आता केला धक्कादायक खुलासा

नवाझ मुजफ्फरनगरला पोहोचल्यावर तिथे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार या सर्वांना त्याच्या कोरोना टेस्ट मुंबईमध्येच केल्या होत्या. ज्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. दरम्यान या सर्वांना मुंबई ते मुजफ्फरनगर या प्रवासात काही स्थानिक वैद्यकीय कर्माचाऱ्यांना आपल्या मेडिकल रिपोर्ट द्यावा लागला होता. एवढं सर्व झाल्यानंतरही मुजफ्फरनगर प्रशासनानं या सर्वांना खबरदारी म्हणून 14 दिवासांसाठी क्वारंटाइन केलं आहे.

रिद्धीमा कपूरनं शेअर केला फॅमिली Photo, नीतू आणि रणबीर तर दिसले; पण बाबा...

First published: May 18, 2020, 11:37 AM IST

ताज्या बातम्या