मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Lockdown 21 Days : रिंकू सध्या काय करते माहित आहे का? पाहा VIDEO

Lockdown 21 Days : रिंकू सध्या काय करते माहित आहे का? पाहा VIDEO

देशात सध्या लॉकडाउन असल्यानं सर्वजण घरीच आहेत. पण तुमची लाडकी रिंकू सध्या काय करते आहे माहित आहे का?

देशात सध्या लॉकडाउन असल्यानं सर्वजण घरीच आहेत. पण तुमची लाडकी रिंकू सध्या काय करते आहे माहित आहे का?

देशात सध्या लॉकडाउन असल्यानं सर्वजण घरीच आहेत. पण तुमची लाडकी रिंकू सध्या काय करते आहे माहित आहे का?

मुंबई, 26 मार्च : कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात हा व्हायरस वेगानं पसरत असल्यानं सध्या देशात पुढच्या 21 दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच घरी आहे. अशाच सर्व सेलिब्रेटी त्यांच्या सोशल मीडियावरुन व्हिडिओ शेअर करुन सर्वांना या व्हायरसबाबत जागरुक करताना दिसत आहेत. पण तुमची लाडकी रिंकू सध्या काय करते आहे माहित आहे का? रिंकू सुद्धा सध्या तुमच्या आमच्यासारखीच घरी आहे.

सैराट सिनेमातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू सध्या कोरोना व्हायरसमुळे घरीच आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची काम थांबली आहे. सध्या लॉकडाऊन असल्यानं रिंकू तिच्या घरच्यांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे तिच्या आईला घरकामात मदत करताना दिसत आहे.

बायकोला पाठीवर बसवून मिलिंद सोमणनं मारले पुशअप्स; म्हणाला, 'तुम्ही असं काही…'

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रिंकू पोळ्या करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ती एखाद्या सराईताप्रमाणे पोळ्या लाटताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रिंकूनं आपल्या चाहत्यांना खास मेसेजही दिला आहे. तिनं लिहिलं, ‘Stay home stay safe. घरी रहा. आईला घर कामात मदत करा, पुस्तकं वाचा, फिल्म बघा, चित्रं काढा, व्यायाम करा. काळीज घ्या.’

तोंडाला प्लास्टिक बांधून अभिनेत्रीनं केलं असं काही की, VIDEO पाहून उडेल थरकाप

एकूण काय तर रिंकू सुद्धा तुमच्या आमच्या सारखाच कुटुंबाला वेळ देत आहे. घरी जेवण बनवत आहे तिच्या आईला मदत करत आहे आणि यासोबतच शूटिंगच्या बीझी शेड्युलमधून वेळ न मिळाल्यानं जोपासता येत नसलेले तिचे छंद जोपासत आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. रिंकू शेवटची मेकअप या सिनेमात दिसली होती. तिच्या या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला होता. या सिनेमात तिनं चिन्मय उदगीरकरसोबत स्क्रिन शेअर केली होती.

मोनोलॉगनंतर आता Coronavirus वर कार्तिकचं नवं रॅप साँग, पाहा Video

First published:

Tags: Rinku rajguru