मुंबई, 26 मार्च : सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरसनं आता भारतातही शिरकाव केला असून या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं वाढताना दिसत आहे. त्यामुळे या व्हायरसला रोखण्यासाठी पंतपधान मोदींनी देशभरात 21 दिवस लॉकडाउनची घोषणा केली आहे. या सगळ्यात बॉलिवूड सेलिब्रेटी सुद्धा त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यामातून सर्वांना घरी राहण्याचं अपील करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यननं यावर मोनोलॉग केला होता. त्यानंतर आता त्याचं कोरोना व्हायरसवरील रॅप साँग खूप व्हायरल होताना दिसत आहे. कार्तिकनं काही दिवसांपूर्वीच कोरोना व्हायरसवर एक मोनोलॉगचा व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात तो त्याचा सिनेमा प्यार का पंचनामाच्या स्टाइलमध्ये एक डायलॉग बोलताना दिसला होता. या डायलॉग मधून त्यानं लोकांना घराबाहेर न पडण्याचं अपील केलं होतं. तसेच घरी राहून आपल्या जवळच्या व्यक्तीची आणि स्वतःची काळजी घ्या असं त्यानं या डायलॉग मधून सांगितलं होतं. त्यानंतर आता त्यानं याच डायलॉगवर एक रॅप साँग तयार केलं आहे. जे त्यानं त्याच्याच स्टाइलमध्ये गायलं आहे. हिंदी चित्रपसृष्टी गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन
कार्तिकनं नुकताच एक नवा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो सध्या कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी काय काय काळजी घ्यायला हवी आणि स्वतःला कसं या रोगापासून वाचवायला हवं हे सांगितलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 21 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानं लिहिलं, ‘जो पर्यंत तुम्ही सर्वजण याला गांभीर्यानं घेऊ घरी बसत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आठवण करुन देत राहणारच.’ BOLD लुकमध्ये दिसली रणबीर कपूरची हिरोइन, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा कोरोना व्हायरसमुळे अनेक सेलिब्रेटींच्या सिनेमाची शूटिंग थांबली आहे. कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा भूलभूलैय्याचं शूटिंगही या व्हायरसमुळे थांबवण्यात आलं. हा व्हायरस येण्याआधी कार्तिकच्या सिनेमाचं शूटिंग लखनऊमध्ये सुरू होतं. या सिनेमात त्याच्यासोबत कियारा अडवाणी दिसणार आहे. दरम्यान या दोघांचा सेटवरील एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. Coronavirus मुळे हॉस्पिटल्स कमी पडलीत तर काय? बिग बींनी शेअर केली आयडिया