मुंबई, 26 मार्च : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची बायको नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेचा विषय ठरतात. 2018 मध्ये मिलिंद सोमणनं अंकिता कोनवारशी लग्न केलं. तेव्हापासून कोणत्याही फिटनेस इव्हेंटला हे दोघं एकत्र दिसतात. मिलिंदच्या फिटनेसबद्दल तर सर्वांना माहित आहे. पण अंकिता सुद्धा त्याच्या इतकीच फिटनेस फ्रिक आहे. सध्या हे दोघंही सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत. अशात या दोघांचा एक रोमँटिक फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार मागच्या 8 दिवसांपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. अशात तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना फिटनेस टिप्स देताना दिसत आहे. त्यानं नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो बायको अंकिताला पाठीवर बसवून पुशअप्स मारताना दिसत आहे. मात्र त्यानं नुकतेच ज्यांनी पुशअप्स मारायला किंवा एक्सरसाइझ करायला सुरुवात केली आहे त्यांना मात्र त्यानं असं करण्यास मनाई केली आहे.
मोनोलॉगनंतर आता Coronavirus वर कार्तिकचं नवं रॅप साँग, पाहा Video
मिलिंदनं हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं, आठवा दिवस, तुमच्याकडे जे आहे त्याच्यासोबत तुम्ही एक्सरसाइझ करु शकता. जे लोक नेहमी म्हणतात की वेळ नाही ते आता हे कारण देऊ शकत नाहीत. कोणत्याही औषधाशिवाय तुम्ही तुमची इम्युनिटी सिस्टीम तंदुरुस्त ठेऊ शकता. सोप्या गोष्टी ट्राय करा. जसं सुर्यनमस्कार घालून तुम्ही तुमचं शरीर फिट ठेऊ शकता. पण पहिल्यांदाच एक्सरसाइझ करत असाल तर आपल्या पत्नीला अशाप्रकारे उचलण्याचा प्रयत्न करू नका.
सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे अभिनेत्री, टेलर मिळाला नाही तर स्वतःच शिवले पडदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आता 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत बंद राहणार आहे. याचाच फायदा सध्या मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी करुन घेताना दिसत आहे. यासोबतच तो चाहत्यांनाही फिटनेस टिप्स देत आहे. मिलिंदनं एप्रिल 2018 मध्ये अंकिताशी लग्न केलं होतं. अंकिता त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान आहे. त्यामुळे त्यांच्यातील वयाच्या फरकावरुन त्यांच्यावर बरीच टिका सुद्धा झाली होती.
BOLD लुकमध्ये दिसली रणबीर कपूरची हिरोइन, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा