मुंबई, 26 मार्च : सध्या कोरोना व्हायरसनं सगळीकडे हाहाकार माजवला आहे. अख्खं जग या व्हायसरमुळे हादरुन गेलं आहे. दरम्यान सर्वाच बॉलिवूड सेलिब्रेटी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं या व्हायरसबाबत जागरुकता पसरवण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता सेलिब्रेटी व्हिडीओ शेअर करुन कोरोनापासून बचाव कसा करावा याची माहिती देताना दिसत आहे. कार्तिक आर्यननं त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप साँगचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आता अभिनेत्री शेफाली शाहने तिच्या इन्स्टाग्रामवर असा काही व्हिडीओ शेअर केला जो पाहिल्यावर लोक हैरण झाले आहेत.
शेफाली शाहनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती संपूर्ण चेहऱ्यावर प्लास्टिक बांधलेल्या अवस्थेत दिसत आहे. या व्हिडीओमधून ती लोकांना पुढच्या धोक्यापासून सावध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तोंडावर प्लास्टिक बांधून तो बोलताना दिसत आहे. यावेळी तिनं कोरोना झाल्यावर कसं वाटत हे सांगितलं आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘सुरक्षा सूचना- असं करण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.’ अनेक लोकांनी शेफालीच्या या प्रयत्नांना दाद दिली आहे. मात्र यासोबतच काही लोकांनी मात्र तिच्या या व्हिडीओला भीतीदायक म्हटलं आहे.
सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे अभिनेत्री, टेलर मिळाला नाही तर स्वतःच शिवले पडदे
या व्हिडीओमध्ये शेफालीनं तिच्या चेहऱ्यावर प्लास्लिक घट्ट बांधलं आहे आणि ती सांगत आहे, क्वारंटाईमध्ये काहीसं असंच वाटतं याच्याशी मी सहमत आहे. पण जर COVID-19 नं तुमच्या फुफ्फुसांवर हल्ला केला तर त्यांनाही असंच जाणवेल. याच्यासाठी आपल्याकडे कोणताही मार्ग नाही. त्यामुळे घरी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. कठिण आहे मात्र स्वतःच्या सुरक्षेसाठी गरजेचं आहे.
हिंदी चित्रपसृष्टी गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निम्मी यांचं निधन
शेफाली या व्हिडीओमध्ये पुढे सांगते, जर एक कोरोनाग्रस्त रुग्ण बाहेर गेला तर हा रोग जंगलातल्या वणव्यासारखा पसरत जाईल. जे आधीच काही देशांत झालं आहे. जर या सूचना लोकांसाठी पुरेशा नाहीत तर मला नाही माहित भविष्यात लोकांचं काय होणार आहे. अशा अवस्थेत मला श्वास घेणं कठिण होत आहे. विचार करा जर हा रोग अनेकांना झाला तर कोणीचनीट श्वास घेऊ शकणार नाही. अशाप्रकारे शेफाली कोरोना व्हायरसबद्दल लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
BOLD लुकमध्ये दिसली रणबीर कपूरची हिरोइन, सोशल मीडियावर फोटोंची चर्चा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood