मुंबई, 12 फेब्रुवारी- सुशांत सिंह प्रकरणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला २ वर्षांत अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे. सुशांतच्या निधनानंतर तिच्यावर अनेक आरोप झाले. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या तणावात होती. आता ती यातून सावरली असून पुन्हा नव्याने सुरुवात करत आहे. रियाने व्हाईस रेकॉर्डिंग करून एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिया चक्रवर्तीने व्हिडिओत दोन वर्षानंतर कामावर परतल्याचं सांगितलं आहे. “२ वर्षानंतर कामावर गेले होते. सर्वात कठीण काळात माझ्यासोबत उभ्या राहिलेल्या सर्व लोकांचे खूप खूप धन्यवाद. जे झालं ते झालं, सूर्य नेहमीच चमकत राहतो. कधीच हार मानू नका,” असं रियाने शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे. वाचा- करण-परिणीतीला अटक? ‘हुनरबाज’ च्या सेटवर पोलिसांच्या रेडने उडाली तारांबळ व्हिडिओत रिया एका रेडिओ चॅनलच्या स्टुडिओत स्क्रिप्ट वाचताना आणि रेकॉर्ड करताना दिसत आहे. व्हिडिओत एक क्षण असा येतोय की, ज्यात तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आहे. या व्हिडिओवर रियाची जीवलग मैत्रिण शिबानी दांडेकर हिनं कमेंट केली आहे. तसेच मल्लिका दुआनेही इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिग्दर्शक निधी परमार हिराचंदानी म्हणतेय की, “माझी खंबीर मैत्रिण, अशीच प्रगती करत राहा.” तर ब्लॉगर त्रिशाला सिक्का हिने लिहलंय की, “तू एवढी सुंदर आणि सोज्वळ कशी दिसत आहेस.” वाचा- प्राजक्ता माळीनं केली सरकारला नम्र विनंती ; नेमकी कशासाठी जरा पाहा… रियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाहत्यांची प्रार्थना रियाच्या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट करून तिचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. एका चाहत्यानं लिहलं आहे की, “तुम्हाला कामावर परतताना बघून खूप आनंद झाला.” दुसऱ्या एका युजरने लिहलंय की, “नवीन गाणं येतंय काय ?” तर आणखी एकानं लिहलंय की, “तुमचा अभिमान आहे. आपण सर्वात खंबीर आहात.”
रिया चक्रवर्ती शेवटची ‘चेहरे’ चित्रपटात दिसली सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती अभिनय क्षेत्रापासून लांबच होती. ती शेवटची रूमी जाफरी यांच्या चेहरे या चित्रपटात दिसली होती. २०१९-२० मध्ये शुट झालेला हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता इमरान हाश्मी, अमिताभ बच्चन, सिद्धांत कपूर, रघुबीर यादव दिसले होते.

)







