मुंबई, 12 फेब्रुवारी- सध्या ‘हुनारबाज**’ (Hunarbaaz:Desh Ki Shaan )** हा टीव्ही शो चांगलाच गाजत आहे. शोमध्ये येणाऱ्या नवनवीन टॅलेंटमुळे या शोची सतत चर्चा होत असते. परंतु आज हा शो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. या शोची शूटिंग सुरु असताना अचानक पोलिसांचा छापा (Police Raid) पडतो. आणि सेटवर एकच तारांबळ उडते. शोचे परीक्षक मिथुन चक्रवर्ती, करण जोहर आणि परिणीती चोप्रासुद्धा भांबावून जातात. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण कलर्स वाहिनीवर ‘हुनरबाज’ हा शो आपल्या भेटीला येतो. यामध्ये देशातील विविध कानाकोपऱ्यातील लोक येऊन आपल्यामध्ये लपलेलं कौशल्य सिद्ध करतात, आपली कला सादर करतात. आपल्या दमदार जॉनरमुळे सध्या या शोची बरीच चर्चा आहे. या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती, करण जोहर आणि परिणीती चोप्रा आहे. तर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे दोघे होस्टच्या भूमिकेत आहेत. या दोघांच्या विनोदी शैलीमुळे शोच्या प्रेक्षकांचं आणखीनच मनोरंजन होतं. परंतु सध्या या शोमध्ये असं काही घडलं की पाहून सर्वच लोक चकित झाले आहेत. या शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिघेही परिक्षक पुढील स्पर्धकाची वाट पाहात असतात. दरम्यान अचानक सेटवर पोलीसांची धाड पडते, आणि सर्वजणच भांबावून जातात. कोणालाही समजत नाही की हे नेमकं काय सुरूय. हे पोलीस अधिकारी बघता-बघता सगळ्या सेटचा ताबा घेतात. आणि नंतर मास्क न घातल्याने मिथुन चक्रवर्ती, करण आणि परिणीतील खडसावतात. यावेळी करण पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतो, की आमचं शूटिंग सुरु आहे. यावर तो पोलीस अधिकारी उत्तर देत म्हणतो, ‘आता कोण स्पर्धक आहे का तुमच्यासमोर? नाही ना? मग का मास्क लावू शकत नाही? यावर करणसह सर्वच निरुत्तर होतात. तर दुसरीकडे महिला पोलीस परिणीतीला मास्क लावण्याचा दम देते. आणखी एक पोलीस भारती आणि हर्षला तुम्ही इतके मोठे कलाकार असून हे काय सुरु आहे? असा प्रश्न करतो. यावर सर्वच घाबरून जातात.पोलीस अधिकारी वारंवार सांगतात सध्या कोरोना महामारी सुरूय आणि मास्क नाहीय. त्यांनतर सर्वचजण शांत होतात. सेटवर सर्वजण इतके घाबरतात की करण प्रॉडक्शन हाऊसला हाक द्यायला लागतो.
कोण होते हे पोलीस- त्यांनतर ते पोलीस अधिकारी आपली ओळख करून देत सांगतात की आम्ही हिमाचल प्रदेशचे पोलीस आहोत. आणि हा केवळ एक विनोद होता. इथं सर्व प्रकारची काळजी घेऊनच शूटिंग सुरु आहे. खरंतर आम्हीच तुमचे पुढचे स्पर्धक आहोत. हे ऐकून सर्वच थक्क होतात. आणि सुटकेचा निःश्वास सोडतात. हिमाचल प्रदेशातील पोलिसांचा हा एक नामांकित बँड आहे. आणि हे पोलीस कर्मचारी आपली कला सादर करण्यासाठी या मंचावर आले आहेत. हा बँड सरकार मान्यताप्राप्त आहे. सर्व सत्य समजताच परीक्षक आपण खरंच खूप घाबरल्याचं सांगतात. इतकंच नव्हे तर आपल्याला अटक होईल अशी भीती वाटल्याचंही सांगतात. त्यांनतर सर्वच परीक्षक हसायला सुरुवात करतात.