मुंबई, 12 फेब्रुवारी- अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय तिच्या आगामी प्रोजक्टबद्दल माहिती देखील ती शेअर करत असते. नुकताच प्राजक्ताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिनं थेट सरकारला साकडं घातलं आहे. म्हणजे तिनं सरकारला एक कळकळीचं विनंती केली आहे. यामुळे प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. प्राजक्ताने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, लहान तोंडी मोठा घास…पण आता बोलायला हवे.सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, करोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते.तरी आमची विनंती विचारात घ्यावी.प्राजक्त माळी या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे की, नुकताच आमच्या पावनखिंड या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय मराठी सिनेमांना देखील तुम्ही चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र आता कोरोनाचा धोका कमी होत आहे. त्यामुळे सरकारने काही नियम शिथिल केले आहेत. मात्र सिनेमागृह असतील किंवा नाटकाचे प्रयोग याला आजही 50 टक्के उपस्थितीचा नियम आहे. त्यामुळे हा नियम शिथिल करून शंभरे टक्के उपस्थितीचा नियम करावा, अशी आमची सरकारला नम्र विनंती आहे. आमच्या विनंतीचा विचार करावा अशी मागणी प्राजक्ताने या व्हिडिओमधून केला आहे. वाचा- प्रसिद्ध अभिनेत्रीला पितृशोक, भावनिक पोस्ट करत दिली माहिती कोविड रुग्णांचा महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढणारा आकडा पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. यामध्ये चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी असा नियम करण्यात आला होता. आता यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी प्राजक्ताने केली आहे. अनेकांनी कोरोनाचा वाढता प्रसार पाहता सिनेमाच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या आहेत तर काहींनी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘पावनखिंड’ या (Pawankhind Trailer ) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ यांच्या मुख्य भूमिका आहेत. वाचा- नकुशी मालिकेतील अभिनेत्रीचं पार पडलं लग्न, आता परदेशात होणार स्थायिक? दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली होती. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं होते की, ‘उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे ‘पावनखिंड’ चे ट्रेलर! हर हर महादेव’’