Home /News /entertainment /

‘माझं शरीर, माझी मर्जी...’ क्लीवेजवरुन ट्रोल करणाऱ्यांना रश्मी देसाईनं झापलं

‘माझं शरीर, माझी मर्जी...’ क्लीवेजवरुन ट्रोल करणाऱ्यांना रश्मी देसाईनं झापलं

काही दिवसांपूर्वीच संपलेल्या बिग बॉसच्या 13 सीझनमुळे रश्मी चांगलीच चर्चेत राहिली होती. पण तिच्या ड्रेसिंगवरुन तिला ट्रोल केलं होतं.

  मुंबई, 11 मार्च : अभिनेत्री रश्मी देसाईचं नाव टीव्हीच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. ‘उतरन’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणाऱ्या रश्मीनं या ठिकाणी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच संपलेल्या बिग बॉसच्या 13 सीझनमुळे रश्मी चांगलीच चर्चेत राहिली होती. यावेळी सिद्धार्थ शुक्लाशी असलेलं तिचं नातं आणि अरहान खान याच्याशी असलेलं अफेअर या सर्व गोष्टींची जोरदार चर्चा झाली. याच शोमध्ये असताना अरहान खाननं तिचा कशाप्रकारे विश्वासघात केला हे समोर आलं मात्र ती या सर्व गोष्टींना खंबीरपणे सामोरी गेली. पण काही दिवसांपूर्वी तिच्या ड्रेसिंगवरुन तिला ट्रोल केलं होतं त्यावर आता रश्मीची प्रतिक्रिया आली असून तिनं या सर्वच ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. रश्मी देसाईनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रोलर्सचा खरपूस समाचार घेतला आहे. यावेळी तिला सतत केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगवर ती पहिल्यांदाच बोलली. ती म्हणाली, 'मला माझी साइझ, मेकअप, कपडे, केस आणि लो क्लीवेज यावरुन अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. मी अशा लोकांपैकी आहे. ज्यांचं वजन सतत कमी-जास्त होत असतं. पण आता लोकांना या गोष्टीमुळेही समस्या आहे. अनेकदा असं होतं की लोकांना माझा डान्स किंवा कपडे आवडत नाहीत.' रंगोलीने चव्हाट्यावर आणली प्रायव्हेट गोष्ट, बहिणीच्या त्या ट्वीटमुळे कंगना भडकली
  रश्मीनं पुढे म्हणाली, मला सतत ट्रोल करणाऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की, हे माझं शरीर आहे. माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन जे मला योग्य वाटतं. कारण यावर फक्त माझा हक्क आहे. यावेळी तिनं अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. स्त्री-पुरुष मानधनाबद्दलही तिनं तिचं मत मांडलं. ती म्हणाली, जर अभिनेत्याला जास्त पैसे मिळत असतील तर ती त्याची मेहनत आहे. मी त्यावर प्रश्न उपस्थित करु शकत नाही. पण मला तेच मिळत आहे. ज्याच्यावर माझा हक्क आहे. "लोक आताही मला असं म्हणतात...", सावत्र आईच्या टॅगमुळे करीना कपूर वैतागली
  रश्मी देसाईच्या या मताचं खूप कौतुक केलं जात आहे. अनेक चाहत्यांनी तिनं ट्रोलर्सना दिलेल्या उत्तराचं कौतुक केलं आहे. रश्मी ज्याप्रमाणे तिच्या आयुष्यात खंबीरपणे सर्व गोष्टींना सामोरी गेली ते खरंच कौतुकास्पद आहे असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. याच जोरावर तिनं बिग बॉसच्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये आपली जागा बनवली होती. होळीत बिग बॉस फेम आसिम रियाजचा जॅकलीन फर्नांडीससोबत रोमान्स, हा व्हिडीओ पाहाच
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bigg boss, Bollywood

  पुढील बातम्या