मुंबई, 10 मार्च : अभिनेत्री कंगना रनौतचं (kangana ranaut) सोशल मीडिया अकाऊंट नाही. मात्र तिची बहीण रंगोली चंदेल (rangoli chandel) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आपल्या कुटुंबाबाबत, कंगनाबाबत आणि इतर घडामोडींवर ती व्यक्त होत असते. आतापर्यंत सोशल मीडियावर कंगनाच्या वतीनं नेहमी तिनंच बाजू मांडली आहे. मात्र आता ओघाओघानं कंगनाबाबत तिनं केलेल्या ट्वीटमुळे (tweet) कंगनाच तिच्यावर भडकली आहे. तापसी पन्नूचा थप्पड (Thappad) चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, रंगोलीनं अशी चूक केली, ज्यामुळे तिची बहीण कंगना नाराज झाली आहे. कंगनासोबत झालेली प्रायव्हेट चर्चाही तिनं ट्विटरवर शेअर केली, ज्यामुळे कंगना नाराज झाली. खुद्द रंगोलीनंच याबाबत ट्विट केलं आहे. थप्पड चित्रपटावर प्रतिक्रिया म्हणून केलेल्या ट्वीटमध्ये रंगोलनी बीगी 3 चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी थप्पडवरून केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला आहे.
यानंतर पुढे थप्पडवरून सुरू असलेल्या वादावर कंगनाने काय प्रतिक्रिया दिली हेदेखील तिनं सांगितलं.
कंगनाने दिलेल्या प्रतिक्रिया सांगताना ओघाओघात रंगोलीनं त्यांच्यामध्ये झालेल्या प्रायव्हेट चर्चेचाही उल्लेख केला.
रंगोलीच्या या ट्विटनंतर कंगना नाराज झाली आहे, रंगोलीनं स्वत: ट्वीट करून हे सांगितलं.
नाराज कंगनाने रंगोलीला असं पुन्हा करू नको, अशी सक्त ताकीदही दिल्याचं रंगोलीनं म्हटलं.