मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

"लोक आताही मला असं म्हणतात...", सावत्र आईच्या टॅगमुळे करीना कपूर वैतागली

"लोक आताही मला असं म्हणतात...", सावत्र आईच्या टॅगमुळे करीना कपूर वैतागली

करीना कपूर हिने एका मुलाखतीदरम्यान तिच्याशी जोडलेल्या या टॅगबद्दल राग व्यक्त केला

करीना कपूर हिने एका मुलाखतीदरम्यान तिच्याशी जोडलेल्या या टॅगबद्दल राग व्यक्त केला

करीना कपूर हिने एका मुलाखतीदरम्यान तिच्याशी जोडलेल्या या टॅगबद्दल राग व्यक्त केला

    मुंबई, 10 मार्च : करीना कपूर (Kareena Kapoor) एक उत्तम अभिनेत्री बरोबरच परिपूर्ण पत्नी आणि आईदेखील आहे. ती ज्या प्रकारे तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य जगते, त्याचं अनेकजण कौतुक करतात. मात्र करीनाला तिच्या नावापुढे जोडलेले 'हे' टॅग्स अजिबात आवडत नाही. एका मुलाखतीदरम्यान करीनाने याचा खुलासा केला. सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) करीनाचे खूप चांगले बंधन आहे. करीनाने सांगितले की, ‘तिला सावत्र आई म्हणून सारासोबत असलेल्य़ा त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा प्रश्न विचारले जाते. 'लोक अजूनही मला सावत्र आई म्हणतात. पण असं नाही आहे. मी माझ्या आयुष्याकडे अशा पद्धतीने पाहत नाही आणि असं वाटतं की कोणीही तसं करू नये.' हे वाचा - स्विमिंग सूटमधील दीपिकाचे फोटो पाहून चाहते म्हणाले, ‘सर्वात HOT फोटोशूट...’ या मुलाखतीत करीनाने आपल्या टॉप पाच भूमिकांविषयी चर्चा केली. यामध्ये 'हिरोईन' (Heroine) या चित्रपटाचाही समावेश आहे. या सिनेमात करीना कपूरने न्यूड सीन दिला होता. ही पहिलीच वेळ होती जेव्हा करीना काही वेगळं करत होती. याबद्दल बोलताना करिना म्हणाली की, ‘चित्रपट कसाही असो... लोक याबद्दल काहीही बोलतील. मात्र मला या चित्रपटाबद्दल अभिमान वाटतो.’ ती पुढे म्हणते की, ‘या चित्रपटासाठी मी माझे हजार टक्के दिले होते. चित्रपटासाठी मी न्यूड सीनदेखील केला. या चित्रपटासाठी मी माझ्यातील अनेक पैलूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. ज्याबद्दल मी कदाचित दुसर्‍या चित्रपटात करण्यापूर्वी विचार केला असता. कदाचित प्रेक्षक मला त्या अवतारात पहायला तयार नव्हते. चित्रपटाला आलेल्या प्रतिक्रियांमधून असचं वाटतं’ या मुलाखतीत करिनाने तिच्याशी जोडलेल्या ‘डिवा’ (Diva) इमेजबद्दलही खुलासा केला. तिला डिवा हे टॅग स्वत:ला लावून घेणे केव्हाच आवडले नसल्याचे तिने या मुलाखतीत सांगितले. पूर्वी डिवा आणि आता सावत्र आई या दोन्ही टॅगमुळे बेबो त्रस्त असल्याचे तिने आपल्या मुलाखतीत सांगितले. हे वाचा - 'हिरॉईन' मधील इंटिमेट सीनबद्दल करीना कपूरचा खुलासा, म्हणाली...
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Sara ali khan

    पुढील बातम्या