मुंबई, 10 मार्च : सर्वत्र होळीचा उत्साह आहे आणि या होळीच्या उत्सवाचा आनंद बिग बॉस फेम आसिम रियाज (Asim Riaz) आणि जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) यांनीही लुटला आहे. होळीच्या निमित्ताने दोघंही रोमान्स करताना दिसले.
आसिम आणि जॅकलीन यांचा हा होळी रोमान्स प्रत्यक्षात नव्हे तर गाण्यात दिसला आहे. आसिम आणि जॅकलीन यांचं मेरे अंगने मे (Mere Angne Mein) गाणं रिलीज झालं आहे.
हे गाणं 1981 मधील अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'लावारिस'मधील सुपरहिट गाणं ‘मेरे अंगने में तुम्हाला क्या काम है’चं रिमिक्स आहे. यामध्ये राजकुमारीची कथा सांगण्यात आली आहे. ही कथा होळीशी संबंधित आहे. पंधराव्या शतकात राजकुमारीचं लग्न होत असतं, तेव्हा एकविसाव्या शतकात होळी साजरी करत असलेला एक तरुण या राजकुमारीसमोर येतो आणि त्या राजकुमारीला 1435 सालातून 2020 सालातील होळी उत्सवात घेऊन येतो.
हे वाचा - ...जेव्हा जया बच्चन यांनी लावला होता रेखा यांना रंग, हा खास VIDEO पाहिलात का?
बिग बॉस-13 मुळे आसिम रियाजला प्रसिद्धी मिळाली. याआधी त्याला कुणी फारसं ओळखत नव्हतं. मात्र या शोने त्याला सुपरस्टार बनवलं. बिग बॉस-13 नंतर हे गाणं म्हणजे आसिम रियाजचा पहिला प्रोजेक्ट आहे. 5 मिनिटांच्या या गाण्यात आसिम काही मिनिटांसाठीच दिसत आहे. मात्र तरीही चाहत्यांचं त्यांनी मनं जिंकून घेतलं आहे.
हे वाचा - होळीमध्ये अनेक वर्षांपासून याच गाण्यांची धूम, एका क्लिकवर अशी मिळेल Playlist