Home /News /entertainment /

Ranveer Singh Birthday : कुठंवर आलं बाळाचं प्लॅनिंग? रणवीरला होणाऱ्या मुलांसाठी काय करायचं आहे ऐका!

Ranveer Singh Birthday : कुठंवर आलं बाळाचं प्लॅनिंग? रणवीरला होणाऱ्या मुलांसाठी काय करायचं आहे ऐका!

रणवीर आणि दीपिका (Ranveer and Deepika on having children) यांना कायम बाळाबद्दल विचारणा केली जाते. एका नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रणवीर याबद्दल काय म्हणाला माहित आहे का?

  मुंबई 06 जुलै: बॉलिवूडचा एक दमदार, रावडी आणि उत्सहाने भरलेला अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh birthday) त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करणार आहे. रणवीरसाठी बॉलिवूडची आत्तापर्यंतची जर्नी एकदम धमाकेदार आणि उत्सहाने भरलेली राहिली आहे. त्याचा कायमच असणारा एनर्जेटिक अंदाज हेच त्याचं वैशिष्ट्य मानलं जातं. रणवीर आणि दीपिका हे कपल सुद्धा कायमच हेडलाईनमध्ये झळकणारा मुद्दा असतो. सध्या रणवीरला सगळीकडून बाळाच्या प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारले जात आहेत असं चर्चेतून समोर येत आहे. त्याला आपल्या होणाऱ्या मुलांसाठी एक विशेष गोष्ट करायची आहे. रणवीर सध्या बायकोसोबत म्हणजे दीपिका पदुकोण (Ranveer Singh & Deepika Padukone) सोबत अमेरिकेत सुट्टीसाठी गेला आहे. तिथे जाऊन त्यांनी एक कोकणी कार्यक्रमाला हजेरी लावल्याचं समजत आहे. रणवीर आणि दीपिकाची लव्हस्टोरी ही 2 स्टेट सिनेमाची आठवण करून देते. रणवीर हा एक सिंधी मुलगा तर दीपिका कोंकणी मुलगी आहे आणि त्यांच्या लव्हस्टोरीची अफाट चर्चा होत असते. दिपवीरचा एक विडिओ सध्या viral होत आहे ज्यात रणवीरला कोंकणी भाषा शिकायची आहे अशी इच्छा तो व्यक्त करताना दिसतो. रणवीर आणि दीपिकाला मुलांबद्दल (Ranveer and Deepika on having kids) विचारणा झाल्यावर ते सांगतात, “मला आता व्यवस्थित कोकणी भाषा समजते. यामागे एक खूप मोठं कारण आहे, जेव्हा भविष्यात आम्हाला मुलं होतील तेव्हा मला कळलं पाहिजे की त्यांची आई कोकणी भाषेत त्यांच्याशी काय बोलते आहे. मला न कळता ती जर माझ्याबद्दल त्यांना कोड लँग्वेज मध्ये काही सांगत असेल तर मला नाही चालणार.” असं रणवीर हसतहसत सांगतो. हे ही वाचा- 'कुठली महाराणी लागून गेलीस, स्वतःचे कपडे स्वतः सांभाळ'; मुसळधार पावसात नोराचे नखरे बघून भडकले नेटिझन्स दीपिका यावर हसतहसत असं सांगते, “एके दिवशी रणवीरने मला सांगितलं की त्याला कोंकणी भाषा शिकायची आहे तेव्हा मला आनंद झाला. काही काळानंतर मला असं कळलं की त्याला भाषा शिकण्यात रस नाहीये तर होणाऱ्या मुलांना मी माझ्या बाजूने करून घेऊ नये यासाठी त्याला भाषा समजून घ्यायची आहे.”
  रणवीर हा त्याच्या होणाऱ्या मुलांबद्दल फारच उत्सुक आहे असं अनेक मुलाखतीत समोर आलं आहे. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तो असं सांगतो, “माझ्या आयुष्यात स्त्रियांचं महत्त्व खूप मोठं आहे. त्यांच्या स्त्री शक्तीचा हात माझ्या डोक्यावर आहे त्यामुळे मला भविष्यात मुलगी झाली तर जास्त आवडेल. आणखीन एका शक्तीचा वास माझ्या घरात असलेला मला आवडेल” रणवीर सिंगसाठी त्याची प्रत्येक भूमिका ही स्पेशल राहिली आहे. अनेकदा त्याला त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी नावाजलं गेलं आहे. त्याहूनही चाहत्यांना जास्त आवडणारी गोष्ट्य म्हणजे दीपिकाशी त्याचं असलेलं नातं. तो कायमच दीपिकाच्या प्रेमात बुडलेला असतो हे अनेकदा पब्लिक एपियरन्समध्ये सुद्धा दिसून आलं आहे. आलिया रणबीर यांनी दिलेल्या गुड न्यूज नंतर त्यांना बाळाबद्दल प्रकर्षाने विचारणा होताना दिसत आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Birthday celebration, Deepika padukone, Ranveer sigh, Ranveer singh

  पुढील बातम्या