Home /News /entertainment /

'कुठली महाराणी लागून गेलीस, स्वतःचे कपडे स्वतः सांभाळ'; मुसळधार पावसात नोराचे नखरे बघून भडकले नेटिझन्स

'कुठली महाराणी लागून गेलीस, स्वतःचे कपडे स्वतः सांभाळ'; मुसळधार पावसात नोराचे नखरे बघून भडकले नेटिझन्स

स्वतःच्या अदांनी कायमच चाहत्यांना घायाळ करणारी नोरा (Nora Fatehi troll) स्वतःच्या एका कृत्याने सध्या बरीच ट्रॉल होताना दिसतेय.

  मुंबई 5 जुलै: हाय गर्मी असं म्हणणाऱ्या नोरा फतेहीला (Nora Fatehi) सध्या मुसळधार पाऊस काही फारसा मानवत नाही असं दिसतंय. नोरा एका डान्स शोचं परीक्षण करताना दिसत आहे. मुंबईच्या मुसळधार पावसात सध्या नोराची मोठी पंचाईत झाली आहे आणि त्याने सध्या नोरा भयानक ट्रोल सुद्धा होताना दिसत आहे. नोरा ही बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. तिच्या डान्स स्किलची चर्चा सगळ्या भारतभर असते. तसंच तिचा फॅशन सेन्स सुद्धा बराच पसंत केला जातो. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक ती प्रत्येक आऊटफिट मध्ये खुलून दिसते. सध्या नोराचा एक विडिओ viral होताना दिसत आहे ज्यात तिने (Nora Fatehi pink saree) गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून मुंबईच्या मुसळधार पावसात ती साडी सांभाळताना तिच्या नाकीनऊ येताना दिसत आहे. त्यासाठी तिचा बॉडीगार्ड मदतीला धावून आल्याचं दिसत आहे. त्यामुळेच तिला सध्या मोठ्या प्रमाणात (Nora Fatehi trolled) ट्रोल केलं जात आहे. सोशल मीडियावर नोराचा एक विडिओ viral होत असून गाडीतून ती उतरताना दिसत आहे. नोराने साडी नेसली असल्याने तिला व्यवस्थित चालता येत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तिची साडी पकडायला तिचा एक बॉडीगार्ड पुढे येतो, तर दुसरा बॉडीगार्ड छत्री हातात घेऊन उभा असल्याचं दिसत आहे. मुसळधार पावसात बॉडीगार्ड मात्र भिजताना दिसत असल्याने नोरावर अनेकांनी निशाणा साधत तिला ट्रोल केलं आहे.
  ‘कुठली महाराणी लागून गेलीस तू’ असं एक युजर तिला म्हणतो. तर ‘स्वतःची साडी स्वतःला सांभाळता येत नाही का? दुसऱ्या माणसाने स्वतः भिजून हिला मदत का करायची? असे कपडे घालतात कशाला जे स्वतःला सांभाळता येत नाहीत.” असं म्हणत एक युजर तिची कानउघडणी करताना दिसत आहे. हे ही वाचा- काय? महेश बाबूच्या भावाला बायकोनं चपलेनं मारलं! VIDEO होतोय व्हायरल
  “स्वतःच्या मदतनीसांना असं नोकरासारखं वागवणं चुकीचं आहे. अशा विचारसरणीला थांबवलं पाहिजे” असं एकजण म्हणतो.काहींनी त्या भिजणाऱ्या बॉडीगार्डची बाजू घेत त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त केली. “त्या बिचार्या माणसाचा तरी विचार करा जो स्वतः पावसात भिजून तिला मदत करत आहे.” नोराचा हा पिंक साडीमधला लुक येत्या काळात डान्स रिऍलिटी शो मध्ये पाह्यला मिळणार आहे. नोरा सध्या नीतू कपूर यांच्यासोबत ‘दिवाने ज्युनियर्स’ नावाच्या रिऍलिटी शोचं परीक्षण करताना दिसते. मुंअबीमध्ये चालू असणाऱ्या मुसळधार पावसाने नोराची सुद्धा पूर्ती वाट लावून टाकल्याचं दिसत आहे.
  First published:

  Tags: Nora fatehi, Troll

  पुढील बातम्या