मुंबई, 09 सप्टेंबर- एका रात्रीत स्टार होणं काय असतं.. तो अनुभव कसा असतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर रानू मंडल हे चांगलं उदाहरण सर्वांसमोर आहे. आज संपूर्ण देश त्यांना ओळखतो. हिमेश रेशमियाच्या आगामी हॅपी हार्डी और हीर सिनेमासाठी त्यांनी तीन गाणी गायली. त्या कुठेही गेल्या तरी लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढू लागतात. अनोख्या आवाजाने त्यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली.
रानू मंडल यांचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा गेल्या 10 वर्षांपासून दूर राहत असलेली त्यांची मुलगी एलिजाबेथ साथी रॉयही त्यांच्याकडे परतली. नुकताच आता या माय- लेकींचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एलिजाबेथही आईसोबत गाणं गाताना दिसत आहे. एकमेकींच्या साथीने गायलेलं हे गाणं चांगलंच रंगलं.
एलिजाबेथ आणि रानू यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात दोघी मिळून 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे' हे गाणं गात आहेत. काही दिवसांपूर्वी रानू या रेल्वे स्थानकांवर गाणी गाऊन पैसे कमवायच्या याचा अजिबात एलिजाबेथला अंदाज नव्हता असं तिने सांगितलं होतं.
View this post on Instagram
@realhimesh #renumandal #singing #singer #newsinger #shooting #tarimarikhani #bollywood #bati
याशिवाय एलिजाबेथने आरोप केला की, सध्या जो क्लब रानू मंडल यांची काळजी घेत आहे, तो क्लब तिला आईला भेटूच देत नाही. तसंच या क्लबच्या सदस्यांनी तिला धमकावलं असल्याचंही एलिजाबेथने सांगितलं. एलिजाबेथ म्हणाली की, 'असं वाटतं की, अतींद्र चक्रवर्ती आणि तपन दासच (क्लब सदस्य) माझ्या आईची खरी मुलं आहेत. जर मी माझ्या आईला भेटण्याचा प्रयत्न केला तर ते मला मारतील, अशी त्यांनी मला धमकी दिली. ते मला आईशी फोनवरही बोलू देत नाहीत. त्यांनी माझ्या आईचं ब्रेनवॉश केलं आहे. मी नेहमीच माझ्या आईच्या संपर्कात होते. पण वैयक्तिक समस्यांमुळे तिला कधी भेटू शकले नाही.'
KBC: अमिताभ बच्चन यांच्यामुळे या अभिनेत्याच्या वडिलांची स्मृती आली परत
'चांद्रयान 2' वर अदनान सामीने घेतली पाकिस्तानची फिरकी, शेअर केला मजेशीर VIDEO
धर्माच्या नावाखाली सिनेमे सोडणाऱ्या झायरा वसीमच्या Beach Look वर संतापले नेटीझन
कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का
VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा