'चांद्रयान 2' वर अदनान सामीने घेतली पाकिस्तानची फिरकी, शेअर केला मजेशीर VIDEO

'चांद्रयान 2' वर अदनान सामीने घेतली पाकिस्तानची फिरकी, शेअर केला मजेशीर VIDEO

चांद्रयान 2 मिशनच्या लँडर विक्रमचा इस्त्रोशी संपर्क तुटल्यानंतर पाकिस्तानच्या सोशल मीडियावर इस्त्रोला ट्रोल करण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर- चांद्रयान 2 मिशनच्या लँडर विक्रमचा इस्त्रोशी संपर्क तुटल्यानंतर पाकिस्तानच्या सोशल मीडियावर इस्त्रोला ट्रोल करण्यात आलं होतं. यात पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी आणि पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूरही सामील होते. एकीकडे लँडर आणि इस्त्रोचा संपर्क तुटला तरी जगाने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. मात्र पाकिस्तानचा या मिशनवरचा द्वेष स्पष्ट दिसत होता. याच मुद्द्यावरून बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अदनान सामीने ट्वीट करून पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं.

ट्वीटमध्ये त्याने एक व्हिडीओ शेअर करत त्याला पाकिस्तानचं अवकाश मिशन सांगितलं. इमरान खान यांच्या तहरीक-ए-इंसाफ पक्षातील गाणं व्हिडीओत वाजताना ऐकू येतं. व्हिडीओच्या शेवटी फवाद चौधरी यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती नाचताना दाखवण्यात आला आहे.

हा व्हिडीओ शेअर होताच पाकिस्तानी युझरने अदनानवर आक्षेपार्ह टिपणी करायला सुरुवात केली. तर त्यांना उत्तर म्हणून भारतीय युझर्सने अदनानला पाठिंबा दाखवला. अदनान सामीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून मजेशीर कमेंटही पाहायला मिळत आहेत.

धर्माच्या नावाखाली सिनेमे सोडणाऱ्या झायरा वसीमच्या Beach Look वर संतापले नेटीझन

...म्हणून सुशांत सिंग राजपूतने सारासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला

कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का

VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

First Published: Sep 9, 2019 01:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading