मुंबई, 09 सप्टेंबर- आतापर्यंत तुम्ही कौन बनेगा करोडपती (KBC) या रिअॅलिटी शोमध्ये अनेक हृदयस्पर्शी अनुभव ऐकले असतील. पण या शोमुळे कोणाची स्मृती परत आली असं जर तुम्हाला आम्ही सांगितलं तर ते पटेल का? पण हे कितीही विचित्र वाटत असलं तरी खरंय… यूट्यूब (YouTube) स्टार भुवन बामने (Bhuvan Bam) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि केबीसी (KBC) यांचे आभार व्यक्त केले आहेत. स्वतः भुवनने सोशल मीडियावर केबीसीमुळे त्याच्या वडिलांची स्मृती परत आल्याचं मान्य केलं. सध्या कौन बनेगा करोडपतीचा 11 वा सीझन सुरू आहे. नेहमीप्रमाणे हा सीझनही बिग बी होस्ट करत आहेत. यूट्यूब स्टार भुवनने ट्वीट करत म्हटलं की, ‘अमिताभ बच्चन आणि केबीसीच्या टीमचे आभार. शोमध्ये विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांमुळे माझ्या वडिलांना भूतकाळातील अनेक गोष्टी आठवल्या. ब्रेन सर्जरीनंतर ते अनेक गोष्टी विसरले होते. मात्र हा शो पाहण्यासाठी त्यांचा असलेला उत्साह पाहून आम्हाला ते लवकर बरे होतील ही आशा पल्लवीत होते.’
याशिवाय भुवनने अजून एक व्हिडीओ शेअर केला. यात त्याचे वडील केबीसी पाहताना दिसत आहेत. भुवनच्या ट्वीटनंतर त्याच्या चाहत्यांनी वडिलांना लवकर बरं वाटेल अशा शुभेच्छा देणारे ट्वीट केले. भुवनच्या वडिलांची ब्रेन सर्जरी झाली. या सर्जरीचा त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला, त्यामुळे त्यांना भूतकाळातील काही गोष्टी आठवत नव्हत्या. मात्र केबीसी पाहताना अनेक गोष्टी त्यांना आठवू लागल्या.
Waiting for the next question!💪🏼😬 pic.twitter.com/fgUwBP6qGS
— Bhuvan Bam (@Bhuvan_Bam) September 6, 2019
भुवन बाम हा एक प्रसिद्ध यूट्यूब आर्टिस्ट आहे. त्याचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. तो बीबी की वाइन्स नावाने व्हिडीओ तयार करतो आणि त्याच्या यूट्यूब चॅनलवर शेअर करतो. तरुणाईमध्ये भुवन बाम हे नाव फारच प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे तो भारतातील पहिला यूट्यूब आर्टिस्ट आहे ज्याचे सबस्क्रायबर 10 दशलक्षहून जास्त आहेत. यूट्यूबशिवाय भुवनने प्लस मायनस या सिनेमात दिव्या दत्तासोबत काम केलं आहे. तसंच ‘संग हूं तेरे, तेरी मेरी कहानी, सफर और रहगुजर’ हे भुवन बामचं गाणं तरुणाईमध्ये तुफान प्रसिद्ध आहे. ‘चांद्रयान 2’ वर अदनान सामीने घेतली पाकिस्तानची फिरकी, शेअर केला मजेशीर VIDEO धर्माच्या नावाखाली सिनेमे सोडणाऱ्या झायरा वसीमच्या Beach Look वर संतापले नेटीझन …म्हणून सुशांत सिंग राजपूतने सारासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला कॅनडात अक्षय कुमारची आहे चक्क पूर्ण टेकडी, त्याची मालमत्ता वाचून बसेल धक्का VIDEO: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा