अक्षय कुमारच्या नावावर आहे चक्क पूर्ण टेकडी, मालमत्ता वाचून बसेल धक्का

अक्षय कुमारच्या नावावर आहे चक्क पूर्ण टेकडी, मालमत्ता वाचून बसेल धक्का

Akshay Kumar | Akshay Kumar Property | मॉरिशसमध्ये समुद्र किनारी मालमत्ता, टोरंटोमध्ये एक बंगला, कॅनडामध्ये एक टेकडी आणि अंधेरीमध्ये चार घरं आहेत.

  • Share this:

मुंबई, 09 सप्टेंबर- बॉलिवूडचा खिलाडी त्याच्या दैनंदिन सवयींबद्दल किती शिस्तबद्ध आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. हा अभिनेता आपल्या फिटनेसबाबतीतही फार जागरुक असतो. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने बॉलिवूडमध्ये २९ वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अक्षयने रुस्तम, बेबी, केसरी, यांसारखे नाविन्यपूर्ण सिनेमे केले आहेत की त्याचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग तयार झाला आहे.

अक्षयचं खरं नाव राजीव ओम भाटिया आहे हे तर साऱ्यांनाच माहीत आहे. सिनेमांत येण्यापूर्वी त्याने आपलं नाव अक्षय कुमार असं केलं. अक्षयचा जन्म अमृतसरमध्ये झाला असला तरी तो लहानाचा मोठा चांदनी चौकमध्ये झाला. मुंबई, कलकत्ता, थायलंड येथे आपलं नशीब आजमावल्यानंतर अक्षयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. २००१ मध्ये त्याने अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केलं. दोघांना दोन मुलं आहेत. आज आम्ही तुम्हाला अक्षय कुमारकडे असलेल्या सर्वात महागड्या गोष्टी, प्रॉपर्टीबद्दल सांगणार आहोत.

KGFस्टार यशने सांगितलं मुलीचं नाव, दोन दिवसांनी बायको म्हणाली मी पुन्हा प्रेग्नट

सिनेमांसाठीचं मानधन-

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमार प्रत्येक सिनेमासाठी साधारणपणे ३० कोटी रुपये मानधन घेतो. तर काहीवेळा अक्षयने प्रत्येक दिवसासाठी १ कोटी रुपये मानधन घेतल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.

जाहिरातींचं मानधन- फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अक्षयने २० ब्रँड साइन केले. तर लाइव्ह मिन्टने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रत्येक जाहिरातीच्या दर दिवसाच्या चित्रीकरणासाठी १ ते १.५ कोटी रुपये घेतो. तर रसना या ब्रँडने १८ कोटी रुपयांत तीन वर्षांचं डिल अक्षयसोबत केलं.

सनीने केला गौप्यस्फोट, सांगितलं का सोडली पॉर्न इंडस्ट्री

प्रोडक्शन हाउस आणि इतर मालमत्ता- अक्षय कुमारने हरी ओम एण्टरटेनमेन्ट आणि ग्रेझिंग गोट पिक्चर्स या दोन प्रोडक्शन हाउस सुरू केल्या. या प्रोडक्शन अंतर्गत त्याने 'रुस्तम', 'पॅडमॅन' आणि 'ओह माय गॉड' या सिनेमांची निर्मिती केली. याशिवाय जुहूमध्ये अक्षय आणि ट्विंकलचं समुद्र किनारी एक घर आहे. तसेच मॉरिशसमध्ये समुद्र किनारी मालमत्ता, टोरंटोमध्ये एक बंगला, कॅनडामध्ये एक टेकडी आणि अंधेरीमध्ये चार घरं आहे. विशेष म्हणजे या चार घरांची प्रत्येकी किंमत साधारणपणे ४.५ कोटी ते ५ कोटी रुपये इतकी आहे.

कार- अक्षयकडे रॉयस फॅंटॉम (सुमारे ८.९ कोटी), बेंटले कॉन्टिनेंटल फ्लाइंग स्पूर (सुमारे ३.२१ कोटी), पोर्श केयने (सुमारे १. ४ कोटी) आणि रेंज रोवर वोग (सुमारे २.७५ कोटी) या हाय क्लास गाड्या आहेत.

इतर महागड्या संपत्ती- फार कमी लोकांना माहीत आहे की, अक्षयकडे हार्ले डेव्हिडसन व्ही-रॉड, प्रायव्हेट जेट आहे. याशिवाय तो वर्ल्ड कबड्डी लिगचा मालक आहे.

वार्षिक उत्पन्न- अक्षय कुमार वर्षाला १५० दशलक्ष डॉलर कमावतो.

‘देशासाठी लढा.. जिंकण्यासाठीच लढा..’ सॅम मानेकशॉ यांचे हे 5 कोट एकदा वाचाच!

CCTV VIDEO: धक्कादायक! भरधाव कारनं 3 महिलांना चिरडलं

First published: September 9, 2019, 10:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading