नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांच्या धमाकेदार जोडीने साकारलेल्या बंटी और बबली चित्रपटानंतर आता 'बंटी आणि बबली 2' (Bunty Aur Babli 2) चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यश राज फिल्म्सने बहुप्रतिक्षित 'बंटी और बबली 2' मधील कलाकारांच्या नावाचीही घोषणा केली आहे. चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी बंटी, तर शर्वरी बबलीची भूमिका साकारणार आहे.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी शर्वरी वाघ या चित्रपटामध्ये अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये दिसणार आहे. ही बबली तंत्रज्ञानप्रेमी असेल. तिला डिजिटल आविष्काराची ओळख आहे आणि म्हणूनच फसवणूक करण्यासाठी अत्यंत कुशल आणि सक्षम आहे. या चित्रपटामध्ये मूळ बंटी आणि बबलीच्या भूमिकेत सैफ अली खान आणि राणी मुखर्जी दिसणार आहे. हा चित्रपट पिढ्यांमधील चढाओढ दाखवतो, जेथे खऱ्या बंटी-बबलीचा नवीन बंटी बबलीशी सामना होतो आणि पुढे कथानकला वेगळं वळण मिळतं.
आपल्या भूमिकेविषयी बोलताना शर्वरी म्हणाली, YRF ने चित्रपटामधील बबली म्हणून माझी निवड केल्याचा मला आनंद आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासामध्ये बबली भूमिकेचं श्रेय ही प्रसिद्ध भूमिका साकारलेल्या राणी मुखर्जी यांच्या अभिनयाला जाते. मी त्यांची फॅन आहे आणि या भूमिकेला चित्रपटात न्याय दिला असेन अशा आशा तिने व्यक्त केली आहे. माझी भूमिका आजच्या काळाशी निगडित असल्यामुळे भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला असल्याचंही ती म्हणाली.
सिद्धांत चतुर्वेदीने चित्रपट 'गल्ली बॉय' मधील एमसी शेरच्या भूमिकेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि आता तो पहिल्यांदाच यश राज फिल्म्सचा बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपट 'बंटी और बबली 2' मध्ये हिरोची भूमिका साकारताना दिसणार आहे.
'बंटी और बबली 2' जगभरात 19 नोव्हेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'बंटी और बबली 2'चे दिग्दर्शन वरूण व्ही. शर्मा यांनी केलं असून याआधी त्यांनी YRF चे सर्वात मोठे ब्लॉकबस्टर्स 'सुल्तान' आणि 'टायगर जिंदा है' या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Rani Mukharjee, Saif Ali Khan