• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Salman Khan-संजल लीला भन्साळींसोबतचा वाद विसरून 21 वर्षानंतर दिसणार एकत्र

Salman Khan-संजल लीला भन्साळींसोबतचा वाद विसरून 21 वर्षानंतर दिसणार एकत्र

सलमान खान आणि संजय लीला भन्साळी इंशाअल्लाह’ (Inshallah) सिनेमात एकत्र दिसणार होते. मात्र काही कारणात्सव हा चित्रपट रद्द करावा लागला.मात्र आता ही जोडी पुन्हा ‘बियॉन्ड द स्टार (Beyond The Star)' या माहितीपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : सलमान खान (Salman Khan) आणि संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) मागीत काही वर्षापासून प्रेम आणि द्वेष असं नात आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमानंतर या जोडीने कधीही एकत्र काम केलेले नाही. मात्र तब्बल 21 वर्षानंतर सलमान खान आणि संजय लीला भन्साळी इंशाअल्लाह’ (Inshallah) सिनेमात एकत्र दिसणार होते. मात्र काही कारणात्सव हा चित्रपट रद्द करावा लागला. यामुळे सलमान आणि संजय लीला भन्साळी यांच्यातील संबंध बिघडल्याचे सांगितलं जातं होते. मात्र आता ही जोडी पुन्हा ‘बियॉन्ड द स्टार (Beyond The Star)' या माहितीपटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे. ‘पिंकविला’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आणि संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे. संजय लीला भन्साळी हे सलमान खानच्या ‘बियॉन्ड द स्टार’ या माहितीपटांच्या मालिकेचा एक भाग असणार आहेत. या मालिकेची निर्मिती SKF द्वारे Wiz Films आणि Applause द्वारे केली जाणार आहे. सलमान खानचं आयुष्य अनेक वादानी भरलेले आहे. त्यामुळे हे सगळं पडद्यावर पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वनी असणार आहे. वाचा, 'पाहिले न मी तुला' मालिकेतील अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, लिहिली भावनिक पोस्ट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या माहितीपटांची मालिका ही सलमान खानच्या जीवनावर आधारित असणार आहे. याबाबत काही दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. यातील काहींशी स्वत: सलमान खानने बातचीत केली आहे. संजय लीला भन्साळी हे त्यापैकी एक होते. संजय लीला भन्साळी यांनी लगेचच या माहितीपट मालिकेचा भाग होण्यास होकार दिला आहे. विशेष म्हणजे याचे काही भागही त्यांनी चित्रित केले देखील आहेत. यात सलमानसोबतच्या त्यांचे मैत्रीचे अनेक किस्से आहेत. वाचा, वाढदिवसाला मलायका अरोराने अर्जुन कपूर आणि करिना कपूरसोबत केली लेट Night Party... सलमान खान आणि संजय लीला भन्साळी यांनी 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि अजय देवगण देखील होते. सध्या संजय लीला भन्साळी 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट आणि 'हिरामंडी' या वेबसिरीजमध्ये व्यस्त आहेत. 'गंगूबाई काठियावाडी'चे शूटिंग पूर्ण झाले आहे. तर 'हिरामंडी' या वेबसिरीजचे काम जोरात सुरू आहे. या वेब सीरिजमध्ये एकूण आठ भाग आहेत, त्यापैकी भन्साळी फक्त पहिला भाग दिग्दर्शित करणार आहेत. तर उर्वरित सहा भाग विभू पुरी दिग्दर्शित करणार आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: