मुंबई, 24 ऑक्टोबर : ‘चला हवा येऊ द्या’ (Chala hawa yeu dya) हा शो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या मंचावर आतापर्यंत सेलिब्रिटींची अनेक गुपितं अभिनेता, सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेने **(nilesh sables)**उघड केली आहेत. मात्र, सध्या सोशल मीडियावर चला हवा येऊ द्याच्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये निलेशच्या ठिकाणी एक चिमुकली सूत्रसंचालन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निलेश साबळेऐवजी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (mazi tuzi reshimgath) या मालिकेतील बालकलाकार सर्वांचा आवडती आणि लाडकी परी अर्थात मायरा वायकुळ (mayara vaykul) सुत्रसंचालन करताना दिसत आहे. इतकंच नाही तर झी मराठीवरील उत्सव नात्यांचा या सोहळ्यात अॅकरिंग कोण करणार यावरुनही ती निलेशसोबत भांडण करताना दिसत आहे. मीच झी मराठीवरील उत्सव नात्यांचा या सोहळ्यात अॅकरिंग करणार असल्याचे निलेशला ठणकावून सांगताना दिसत आहे. वाचा, घटस्फोटाच्या 22व्या दिवशी Samantha पोहोचली चारधाम यात्रेला! शेअर केले खास PHOTO सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ‘मायरा चला हवा येऊ द्या’ शोची सुरुवात करताना दिसते आहे. तिने पिंक रंगाच फ्रॉक घातला आहे व ती खूपत क्यूट दिसत आहे. मायराला पाहून निलेश साबळे म्हणतो की, तू झी मराठी अवॉर्डचं अँकरिंग करणार आहेस का? त्यावर परी म्हणते हो.. तिच्या होकारावर निलेश म्हणतो, पण अँकरिंग तर मी करणार आहे. मला चॅनेलकडून फोन आला होता. ते मला पैसेही देणार आहेत.
यावर मला सुद्धा फोन आला होता आणि मला सुद्धा पैसे मिळणार असल्याचं परी सांगते. त्यावर तुला किती पैसे मिळणार असा प्रश्न निलेश विचारतो. निलेशच्या या प्रश्नावर मायरा निरागसतेने बिस्कीटचा पूडा असं उत्तर देते. तिचं हे उत्तर ऐकल्यावर मंचावर एकच हाशा पिकतो. वाचा, ‘पाहिले न मी तुला’ मालिकेतील अभिनेत्रीच्या वडिलांचं निधन, लिहिली भावनिक पोस्ट World Of Myra and Family या यूट्यूब चॅनेलवर मायराचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर मायरा नेहमी चर्चेत असते. तसेचमायरा मालिकेतील कलाकारांसोबत विविध गाण्यावर रील करत असते. तिचे रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. मालिकेत येण्यापूर्वीच मायारा तिच्या रीलमुळे तसेच व्हिडिओमुळे चर्चेत होती. आता परीच्या भूमिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे.