मुंबई, 12 ऑगस्ट- कपूर कुटुंबाचा सर्वात लाडका मुलगा रणबीर कपूर सध्या भट्ट कॅम्पमध्ये जाण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रणबीर नुकताच आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांना भेटायला गेला होता. रणबीरने आलियासोबत लग्न करण्याचा विचार केला असून यासंदर्भात बोलण्यासाठी तो महेश यांना भेटायला गेला होता. यावेळी रणबीर भावुक झाल्याचंही म्हटलं जातं. आलियासाठी मागणी घालताना रणबीरच्या डोळ्यात अश्रू होते. एवढंच नाही तर पुढच्या वर्षी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रणबीर आणि आलिया लग्न बंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे. ऋषी कपूर भारतात परतताच होईल लग्न? इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, रणबीर आणि आलिया दोघंही ऋषी यांची भारतात परतण्याची वाट पाहत आहेत. गेल्यावर्षी ऋषी यांना कर्करोग झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर ते उपचारांसाठी अमेरिकेत गेले. ते अमेरिकेत उपचार घेत असताना मुंबईत त्यांच्या आईचं कृष्णा कपूर यांचं निधन झालं. ऋषी आईच्या अंत्यदर्शनाला येऊ शकले नाही. आता त्यांचे उपचार पूर्ण झाले असून ते अनेकदा न्यूयॉर्कमध्ये पत्नी नीतू कपूर यांच्यासोबत फिरताना दिसतात. स्वतः नीतू त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ऋषी यांचे फोटो शेअर करत असतात.
पहिल्यांदा एका सिनेमात काम करणार रणबीर- आलिया ये जवानी है दिवानी फेम दिग्दर्शक अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एकत्र काम करणार आहेत. या सिनेमातून पहिल्यांदा आलिया आणि रणबीर अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे. विशेष म्हणजे रणबीर आणि आलियाच्या वडिलांसोबत अर्थात ऋषी आणि महेश यांच्यासोबत अमिताभ यांनी प्रचंड काम केलं आहे.
मुकेश भट्ट यांनी रणबीर- आलियाच्या लग्नाला म्हटलं अफवा आलिया भट्टचे काका मुकेश भट्ट यांनी रणबीर- आलियाच्या लग्नाच्या बातम्या या फक्त अफवा असल्याचं म्हटलं आहे. सध्या कुटुंब दोघांच्या लग्नाबद्दल कोणताही विचार करत नसल्याचं ते म्हणाले. असं असलं तरी आलियाने तिचं रणबीरसाठी असलेलं प्रेम कधीच लपवलं नाही. तिने रणबीरसोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचंही आधीच मान्य केलं आहे. आलियाला ती लहान असल्यापासूनच रणबीर कपूर फार आवडायचा हे तिने कबूल केलं आहे. पुरग्रस्तांच्या मदतीला धावले रितेश- जेनेलिया देशमुख, केली 25 लाखांची मदत Dream Girl Trailer: हेमा मालिनीला नाही तर आयुष्मानला म्हणाल ‘ड्रीम गर्ल’ या अभिनेत्रीवर होतोय कौटुंबिक हिंसाचार, मुलीला मारायचा नवरा मुशर्रफ यांच्या नातेवाईकांच्या मेहंदीत गायला हा भारतीय गायक, युझर्स म्हणाले…. VIDEO पूरपरिस्थितीत तारतम्य न बाळगणाऱ्या ट्रोलर्सना सई ताम्हणकरनं ‘असं’ खडसावलं

)







