काकांच्या मृत्यूनंतर रणबीर सावरतोय; लवकरच आलियासोबत 'ब्रम्हास्त्र'ची कमिटमेंट करणार पूर्ण

काकांच्या मृत्यूनंतर रणबीर सावरतोय; लवकरच आलियासोबत 'ब्रम्हास्त्र'ची कमिटमेंट करणार पूर्ण

'ब्रह्मास्त्र' हा रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. लवकरच ते दोघे त्याच्या शेवटचा भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 फेब्रुवारी: रिअल लाईफ कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त आहेत. त्यांचा आगामी अ‍ॅक्शनपट चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ साठी ते लवकरच मुंबईतील कांदिवली स्टुडीओ मध्ये शुटींग करणार आहेत. व्हॅलेंटाईन डे नंतर या चित्रपटाच्या शुटींग सुरु होईल. सध्या त्यांची प्रोडक्शन टीम ही भव्य असा सेट कांदिवली कांदिवली स्टुडिओमध्ये उभारत आहे.

‘ब्रम्हास्त्र’ हा चित्रपट निर्माते आयान मुखर्जी यांचा आगामी सुपरहिरो अ‍ॅक्शनपट चित्रपट आहे. खरतर, फेब्रुवारी 2020 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण कोरोना मुळे या चित्रपटाचं शुटींग लांबणीवर पडत गेलं. मागच्या दोन वर्षांपासून या चित्रपटाचे शुटींग सुरु आहे आणि आता ते अंतिम टप्प्यात आले आहे. आलिया आणि रणबीर कपूर हे दोघेही या शूटिंगसाठी आता पूर्णपणे तयार असल्याचं समजत आहे. दोघांनीही आपले उरलेले प्रोजेक्ट्स संपवून आता सगळ्या तारखा ‘ब्रह्मास्त्र’ साठी राखून ठेवल्या आहेत. चित्रपटाच्या शेवटच्या भागाचं शुटींग हे 18 फेब्रुवारी पासून सुरु होईल आणि एक आठवडा चालणार आहे.

हे देखील वाचा -   Ramayana मध्ये दीपिका पादुकोणसोबत मुख्य भूमिकेत झळकणार महेश बाबू; ऋतिक रोशनला डच्चू?

या चित्रपटात आपल्याला अमिताभ बच्चन, डिंपल कपाड़िया, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी हे सुद्धा मुख्य भूमिकेत पहायला मिळतील. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार असुन तो हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या भाषेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येईल. करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे.

Published by: Aditya Thube
First published: February 12, 2021, 6:30 PM IST

ताज्या बातम्या