मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /अरे देवा! Bigg Boss च्या घरात राखी सावंतचा सुटला कंट्रोल; इतकी घाईची लागली की पँटमध्येच...

अरे देवा! Bigg Boss च्या घरात राखी सावंतचा सुटला कंट्रोल; इतकी घाईची लागली की पँटमध्येच...

Big Boss 14 आता एका नव्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. एका टास्कदरम्यान राखी सावंतनं (rakhi sawant) वेगळाच प्रताप केला.

Big Boss 14 आता एका नव्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. एका टास्कदरम्यान राखी सावंतनं (rakhi sawant) वेगळाच प्रताप केला.

Big Boss 14 आता एका नव्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. एका टास्कदरम्यान राखी सावंतनं (rakhi sawant) वेगळाच प्रताप केला.

मुंबई, 21 जानेवारी : बिग बॉस सीझन 14 (Bigg Boss 14) मध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर सोडताना दिसत नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये राखी सावंत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये राखी सावंत हिनं पँटमध्ये लघवी केली. बिग बॉसने घरातील सदस्यांना नवीन टास्क दिला असून यामध्ये सर्वांना गार्डन एरियामध्येच राहायचं आहे. पण या टास्कमध्ये राखी सावंतला स्वत:वर कंट्रोल न झाल्याने तिने कार्यक्रमादरम्यानच आपल्या पँटमध्येच लघवी केल्याची घटना घडली आहे.

बिग बॉसमध्ये(Bigg Boss) स्पर्धकांच्या 2 टीम तयार करण्यात आल्या असून यामध्ये रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) हे दोघं लीडर आहेत. या टास्कमध्ये सदस्यांना घरामध्ये जाण्यास परवानगी नसून केवळ काही काम असेल तरच घरामध्ये जाण्यास परवानगी मिळणार आहे.

हे वाचा - कंगना रणौत हाजिर हो! मुंबई पोलिसांकडून पुन्हा समन्स, जावेद अख्तरांनी केली तक्रार

या टास्कदरम्यान राखी सावंत हिला टॉयलेट आली असता गार्डन एरियामधील टॉयलेट अर्शी खान (Arshi Khan) हिनं राखीला वापरण्यास न दिल्यामुळे राखी सावंतनं आपल्या पँटमध्येच लघवी केली. यानंतर फार वेळ राखी ओल्या कपड्यांमध्ये राहू शकत नव्हती. त्यामुळे राखीनं तिच्या टीम लीडर रुबिनाला (Rubina Dilaik) बोलावून आपला ड्रेस दाखवून संपूर्ण प्रकरण स्पष्ट केलं. इतकंच नाही तर याविषयी कुणालाही सांगू नको अशी विनंतीही तिनं रूबीनाला केली. यानंतर रुबिना हिने राखी सावंतला घरात प्रवेश देऊन अंडरगारमेंट्स बदलण्याची परवानगी दिली.

हे वाचा - Big Boss 14: राखी सावंतने अभिनव शुक्लाला केल प्रपोज, पत्नी रुबीना दिलैकची बत्ती गुल

या टास्कमध्ये घरातील रेशन मिळवण्यासाठी सदस्यांना प्रयत्न करायचे असून ज्या टीममधील सदस्य सर्वात कमी वेळा घरात प्रवेश करेल ती टीम विजयी ठरणार आहे. या टास्कमध्ये राहुल आणि रुबिनाच्या टीममध्ये टास्क होणार असून या टास्कमध्ये राखी सावंत(Rakhi Sawant) प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहे. याआधीच्या भागात राखी सावंतला आपली भूकदेखील कंट्रोल होत नव्हती. ती कधी केळं खाताना तर कधी केळ्याचं साल खाताना दिसत होती. आजच्या एपिसोडमध्ये या टास्कमध्ये आणखी काय मजेशीर घडणार हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bigg boss