जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Big Boss 14: राखी सावंतने अभिनव शुक्लाला केल प्रपोज, पत्नी रुबीना दिलैकची बत्ती गुल

Big Boss 14: राखी सावंतने अभिनव शुक्लाला केल प्रपोज, पत्नी रुबीना दिलैकची बत्ती गुल

Big Boss 14: राखी सावंतने अभिनव शुक्लाला केल प्रपोज, पत्नी रुबीना दिलैकची बत्ती गुल

Big Boss-14: राखी सावंतने (Rakhi sawant) रुबीना दिलैकचा (Rubina dilaik) पती अभिनव शुक्ला (Abhinav shukla) आपल्याला आवडत असल्याचं सांगून टाकलं आहे. राखीने अभिनव शुक्लाला सर्वांसमोर ‘आय लव्ह यू’ (I Love You) म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी: राखी सावंत (Rakhi sawant) बिग बॉस 14 च्या (Big boss- 14) घरात गेल्यापासून प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन (entertainment) होत आहे. राखी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची कोणतीही कसर सोडत नाही. राखी सावंतने बिग बॉस कुटुंबाचंही बरंच मनोरंजन केलं आहे. सध्या राखी सावंत अभिनव शुक्लावर (Abhinav shukla) असलेल्या प्रेमामुळे (Love) चर्चेत आहे. या कार्यक्रमातील सर्व मेंबर्ससमोर राखी सावंतने रुबीना दिलैकचा (Rubina dilaik) पती अभिनव शुक्ला आपल्याला आवडत असल्याचं सांगून टाकलं आहे. राखीने अभिनव शुक्लाला सर्वांसमोर ‘आय लव्ह यू’ (I Love You) म्हटलं आहे. हे ऐकून अभिनव शुक्लाची पत्नी रुबीना दिलैकच्याही बत्त्या गुल झाल्या आहेत. या सीनच्या वेळी राखी सावंत आणि अभिनव शुक्ला दोघेही भांडी साफ करत होते. यावेळी राखी अभिनवला म्हणाली की, मी फक्त तुझ्याबरोबर भांडीच धुणार नाही, तर तुझ्यासोबत कबरेपर्यंत जाण्याची माझी तयारी आहे. यावर अभिनव आश्चर्यचकित प्रतिक्रिया दिली. त्यानंतर मात्र राखी सावंतने अभिनवसाठी, ‘काटे नहीं कटते ये दिन ये रात कहनी थी तुमसे जो दिल की बात….लो आज मैं कहती हूं….आय लव्ह यू’ हे गाणं गायलं. यावेळी जवळच बागेच्या परिसरात निक्की तांबोळीसोबत बसलेल्या रुबीनाने हे सर्व ऐकलं. तेव्हा तिलाही या गोष्टीचा धक्का बसला.

जाहिरात

त्यानंतर रुबीना दिलैकने निक्कीशी बोलताना स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी राखीला अभिनव शुक्लासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना दर्शकांनी पाहिलं आहे. राखीने अलीकडेच बिग बॉसच्या घरात आपल्या वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिनं आपल्या पतीसोबत असलेल्या संबंधाचा देखील खुलासा केला होता. ती म्हणाली होती की रितेश आणि तिच्यात सर्व काही ठीक चालू नाही. ज्यामुळे रितेश तिला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात