मुंबई, 20 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) अडचणी आता अधिकच वाढत चालल्या आहेत. कंगनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा समन्स जारी केला आहे. कंगनाविरोधात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तक्रार केली आहे. कंगनानं मानहानी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता या प्रकरणात कंगनाची चौकशी होणार आहे. जावेद अख्तर यांनी मुंबई पोलिसात (Mumbai Police) कंगना रणौतविरोधात तक्रार दिली आहे. मुंबई पोलिसांनी कंगनाला समन्स बजावला आहे. 22 जानेवारीला तिला जुहू पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. एका मीडिया चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं आपली बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जुहू पोलीस या प्रकरणात तपास करत आहेत आणि त्यासाठीच आता कंगनाची चौकशी केली जाणार आहे. हे वाचा - Bollywood हादरलं! अभिनेत्री बनवण्याचं आमिष दाखवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश कंगना आणि तिची बहिण रंगोली या दोघांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात ट्वीट केलं होतं. यापैकी एका ट्विटवर आक्षेप घेत साहिल नावाच्या एका व्यक्तीने वांद्रे न्यायालयात कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने कंगनाविरोधात राजद्रोह, सामाजिक तेढ निर्माण करणे आणि धार्मिक भावना भडकावणं या कलमांखाली गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात त्यांची चौकशीही झाली आहे. हे वाचा - Tandav मधील वादग्रस्त सीन काढूनही निर्मात्यांना होणार अटक? UP पोलीस मुंबईत दाखल वांद्रे पोलिसांनी कंगनाला 3 ते 4 वेळा नोटीस पाठवूनही कंगनाने याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कंगनानं पोलीस ठाण्यात हजेरी लावली होती. आता ती जुहू पोलीस ठाण्यात चौकशीसाठी जाणार की नाही याकडे लक्ष लागलं आहे. कंगनाचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं बंद दरम्यान आज कंगनाचं ट्विटर अकाउंट (Twitter Account) तात्पुरतं प्रतिबंधित करण्यात आलं होतं. #SuspendKanganaRanaut हा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंड होत होता. कंगनाने याबाबत ट्वीट करत तिच्या विरोधकांना अत्यंत कठोर शब्दात इशारा देखील दिला होता. तिने ट्विटरचे सीईओ जॅक यांना टॅग करत चोख उत्तर दिलं आहे, जे तिचं अकाउंट बॅन व्हावं म्हणून मागणी करत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







