मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raju Srivastava Net Worth: लग्झरी कार अन् करोडोंच्या घरांचे मालक असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्याकडे आहे इतकी संपत्ती

Raju Srivastava Net Worth: लग्झरी कार अन् करोडोंच्या घरांचे मालक असलेल्या राजू श्रीवास्तव यांच्याकडे आहे इतकी संपत्ती

मीडिया रिपोर्टनुसार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते अनेक तास बेशुद्ध होते. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याची कहाणी नेहमी कशी होती आणि त्याचं नेटवर्थ किती आहे जाणून घ्या.

मीडिया रिपोर्टनुसार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते अनेक तास बेशुद्ध होते. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याची कहाणी नेहमी कशी होती आणि त्याचं नेटवर्थ किती आहे जाणून घ्या.

मीडिया रिपोर्टनुसार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते अनेक तास बेशुद्ध होते. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याची कहाणी नेहमी कशी होती आणि त्याचं नेटवर्थ किती आहे जाणून घ्या.

    मुंबई, 11 ऑगस्ट:  कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना काल सकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती नाजूक आहे.  ते व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आले . विनोदाच्या दुनियेत आपली छाप पाडून नवी ओळख निर्माण करणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत सगळेच काळजी व्यक्त करत आहेत. आपल्या स्टँडअप कॉमेडीनं प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी अनेक आयकॉनिक भूमिका निभावल्या ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या गळ्यात ताईत बनले.  प्रेक्षक आजही राजू श्रीवास्तव यांचे चाहते आहेत. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचे मात्र काल जीममध्ये व्यायाम करतेवेळीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला.  मीडिया रिपोर्टनुसार राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते अनेक तास बेशुद्ध होते. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याची कहाणी नेहमी कशी होती आणि त्याचं नेटवर्थ किती आहे जाणून घ्या. राजू श्रीवास्तव उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास आहेत. शुटींगसाठी ते मुंबईत असतात. त्यांच्या जन्म मध्यवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणापासूनच  घरची हालाकीची परिस्थिती ते पाहत आले आहेत. त्यामुळे पहिल्यांपासूनच चिकाटी त्यांच्या अंगी होती.  आपल्या तगड्या मेहनतीनं त्यांनी सिनेसृष्टीत नाव कमावलं.  राजू श्रीवास्तव यांच्याकडे आज आलिशान घर आहे. अभिनेता लग्झरियस आयुष्य जगत आहे. हेही वाचा - Raju Srivastav यांना एकेकाळी मिळाली होती जीवे मारायची धमकी; सध्या हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयात दाखल राजू श्रीवास्तव यांना कलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्यांचे वडील रमेश चंद्रा श्रीवास्तव हे कवी होते. राजू लहानपणापासून मिमिक्री करायचे. कलेची त्यांना विशेष आवड होती. लहानपणापासूनच त्यांना एक कॉमेडियनच व्हायचं होतं.  टीव्ही शो, कॉमेडी शो अवॉर्ड होस्ट करण्यापासून त्यांची सुरुवात झाली. मीडिया रिपोर्टनुसार राजू श्रीवास्तव एका कॉमेडी शोसाठी लाख रुपये चार्ज करतात. सध्या त्यांच्याकडे 15-20 करोडोची संपत्ती आहे. राजू श्रीवास्तव संपूर्ण जगभर कॉमेडी शो करतात. त्याचप्रमाणे त्यांनी आपली ऑडिओ व्हिडीओ सीरिजही काढली आहे.  आजवर त्यांनी अनेक जाहिरातीतही काम केलं आहे. एका जाहिरातीसाठीही ते लाखांमध्ये मानधन घेतात. महानायक अमिताभ बच्चन यांची मिमिक्री करण्यासाठी राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध आहेत. स्ट्रगलच्या काळात त्यांनी बिग बींची मिमिक्री करुन पैसे कमावले होते.  टीव्ही शो, मिमिक्री, जाहीरातीत काम करुन पैसे कमावणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे यूट्यूबरही सर्वाधिक सब्स्क्राइबर्स आहेत. युट्यूबकडूनही त्यांना पैसे मिळतात. हेही वाचा - Raju shrivastav Health Update: शस्त्रक्रियेनंतरही राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर; या कारणामुळे वाढली डॉक्टरांची चिंता राजू श्रीवास्तव लग्झरी कारचे शॉकिन आहेत. त्यांच्याकडे ऑडी Q7 कार आहे. ज्याची शोरुम किंमत जवळपास 90 लाख रुपये आहे. त्यांच्याप्रमाणे त्यांच्याकडे 3 BMW कारही आहेत. ज्यांची शोरुम किंमत 40 लाख रुपये आहे. राजू श्रीवास्तव यांनी 1993मध्ये लग्न केलं. शिखा श्रीवास्तव असं त्यांच्या पत्नीचं नाव असून त्यांना दोन मुलं आहे. मुलाचं नाव आयुष्मान आहे तर मुलीचं नाव अंतरा आहे.
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News

    पुढील बातम्या