मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Raju shrivastav Health Update: शस्त्रक्रियेनंतरही राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर; या कारणामुळे वाढली डॉक्टरांची चिंता

Raju shrivastav Health Update: शस्त्रक्रियेनंतरही राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर; या कारणामुळे वाढली डॉक्टरांची चिंता

प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याला स्वतःहून श्वास घेता येत नाहीय. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याला स्वतःहून श्वास घेता येत नाहीय. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याला स्वतःहून श्वास घेता येत नाहीय. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट- कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांना काल हृदय झटक्यांनंतर रुग्णालयात दाखल करण्यात होतं. त्यांनतर त्यांची हेल्थ अपडेट समोर येत आहे. राजू यांच्या हृदयात ९५ टक्के ब्लॉकेज आढळले आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती अस्थिर असल्याचं म्हटलं जात आहे.बुधवारी वर्कआउट करत असताना त्यांना छातीत दुखू लागलं. त्यांनतर ते ट्रेडमिलवरुन खाली कोसळले होते. त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. येथे तपासणीत त्यांच्या हृदयाच्या मुख्य धमनीत ब्लॉक आढळून आला आहे. अशा स्थितीत डॉक्टरांनी दोन स्टेंट टाकून त्यांच्यवर शस्त्रक्रिया केली आहे. डॉ.अनन्या गुप्ता यांच्या मते, राजू श्रीवास्तव यांची बीपी नियंत्रणात येत नाहीय. सामान्यतः अँजिओप्लास्टी केल्यानंतर रुग्णाची प्रकृती पूर्वपदावर येते आणि त्याला वॉर्डात हलवले जाते. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्यानंतरही त्यांची बीपी 80/56 इतकी कायम आहे. त्यामुळे प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्याला स्वतःहून श्वास घेता येत नाहीय. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. डॉ. अनन्या गुप्ता यांनी पुढं सांगितलं, बीपी नियंत्रित करण्यासाठी राजू श्रीवास्तव यांना इनोटोपचे हाय डोस दिले जात आहेत. हे औषध निर्धारित डोसनुसार दिले जात आहे. राजू श्रीवास्तव यांच्या हृदयविकाराला एक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन असं म्हणतात. (हे वाचा:Raju Srivastav Heart Attack: जिममध्ये वर्कआउट करताना प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका ) कॉमेडियन राजू श्रीवास्तवची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांना काल सकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनतर त्यांना ४८ तास देखरेखेखाली ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु आज त्यांना कार्डियॅक केअर युनिटमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.सध्या त्यांच्यासोबत रुग्णालयात त्यांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्रदेखील आहेत. (हे वाचा:Raju Srivastav यांना एकेकाळी मिळाली होती जीवे मारायची धमकी; सध्या हार्ट अटॅक आल्याने रुग्णालयात दाखल ) राजू श्रीवास्तव हे एक लोकप्रिय कॉमेडियन आहेत. त्यांनी अनेक कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच त्यांनी 'मैने प्यार किया', 'बाजीगर', 'बॉंबे टू गोवा' आणि 'आमदानी अठ्ठ नी खर्चा रुपैया' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. श्रीवास्तव यांनी 'बिग बॉस'च्या तिसऱ्या सीजनमध्येही सहभाग घेतला होता. सध्या श्रीवास्तव हे उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Comedian

    पुढील बातम्या