मुंबई 10 ऑगस्ट: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिम मध्ये वर्कआउट करत असताना त्यांना हार्ट अटॅक आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कॉमेडियन राजू श्रीवास्तव रुग्णालयात ऍडमिट असून त्यांच्यावरील उपचारांना ते सध्या प्रतिसाद देत असल्याची माहिती समोर आली आहे. राजू यांच्याशी निगडित अनेक आठवणी सध्या समोर येत आहेत. त्यांना एकदा नव्हे तर अनेकदा जीवे मारायची धमकी सुद्धा मिळाली आहे. राजू यांचं खरं नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असं आहे. त्यांचा जन्म कानपूरचा असून ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही वर्षांपूर्वी जीवे मारायची धमकी मिळाली होती. त्यांना हे कॉल पाकिस्तानतून करण्यात येत असल्याच सुद्धा सांगितलं जात होतं. त्यांना कराची आणि दुबईमधून हे डेथ थ्रेटचे कॉल येत होते. त्यांनी याविरुद्ध FIR सुद्धा दाखल केली होती. वर्क फ्रंटवर सांगायचं तर राजू यांचं करिअर ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोमुळे सुरु झालं. त्यांनी साकारलेली गाजोडर, राजू भैया अशी अनेक पात्र खूप गाजली होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत.त्यांनी आजपर्यंत तीन हजाराहून जास्त स्टेज शो केले आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं. त्यांचा जन्म हा मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून त्यांना लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायची इच्छा होती.
#UPDATE | Comedian Raju Srivastava's angioplasty has been done at AIIMS Delhi. He is responding to the treatment: Sources
— ANI (@ANI) August 10, 2022
त्यांच्या परिवारात शिखा नावाची पत्नी तर अंतरा आणि आयुष्मान अशी दोन अपत्य सुद्धा आहेत. ते राजकीय क्षेत्रात सुद्धा बरेच सक्रिय आहेत. हे ही वाचा- Raju Srivastav Heart Attack: कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची Angiography सक्सेस; उपचारांना प्रतिसाद आज सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना अचानक ट्रेडमिलवरून राजू खाली कोसळले. त्यांना त्वरित दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केलं गेलं. सध्या त्यांच्यावर केलेली एंजियोप्लास्टी यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना पुढील 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे.