मुंबई, 21 सप्टेंबर- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं. जिम मध्ये वर्कआउट करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं. 6 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव आज अखेर प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा परसली असून सगळ्या स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राजू यांच्याशी निगडित अनेक आठवणी देखील सध्या समोर येत आहेत. त्यांच्या अनेक कॉमेडी स्किट्स, त्यांचे किस्से शेअर केले जात आहेत. राजू श्रीवास्तव यांना त्यांना एकदा नव्हे तर अनेकदा जीवे मारायची धमकी सुद्धा मिळाली होती.
राजू यांची कारकीर्द
राजू यांचं खरं नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असं आहे. त्यांचा जन्म कानपूरचा असून ते उत्तर प्रदेश चित्रपट विकास परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना काही वर्षांपूर्वी जीवे मारायची धमकी मिळाली होती. त्यांना हे कॉल पाकिस्तानतून करण्यात येत असल्याच सुद्धा सांगितलं जात होतं. त्यांना कराची आणि दुबईमधून हे डेथ थ्रेटचे कॉल येत होते. त्यांनी याविरुद्ध FIR सुद्धा दाखल केली होती.
वर्क फ्रंटवर सांगायचं तर राजू यांचं करिअर ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ शोमुळे सुरु झालं. त्यांनी साकारलेली गजोधर, राजू भैया अशी अनेक पात्र खूप गाजली होती. त्यांनी काही चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत.त्यांनी आजपर्यंत तीन हजाराहून जास्त स्टेज शो केले आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं. त्यांचा जन्म हा मध्यमवर्गीय कुटुंबात झाला असून त्यांना लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायची इच्छा होती.
राजू यांचे कुटुंबिय
त्यांच्या परिवारात शिखा नावाची पत्नी तर अंतरा आणि आयुष्मान अशी दोन अपत्य सुद्धा आहेत. ते राजकीय क्षेत्रात सुद्धा बरेच सक्रिय आहेत.आपल्या स्टँडअप कॉमेडीनं प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी अनेक आयकॉनिक भूमिका निभावल्या ज्यामुळे ते प्रेक्षकांच्या गळ्यात ताईत बनले. प्रेक्षक आजही राजू श्रीवास्तव यांचे चाहते आहेत. 58 वर्षीय राजू श्रीवास्तव त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष द्यायचे तरीही त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News