मुंबई, 03 जुलै- प्रभास आणि श्रद्धा कपूरचा आगामी साहो सिनेमातील द सायको सैया गाण्याचा पहिला लुक समोर आला आहे. प्रभासने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर गाण्यातील त्याचा डॅशिंग लुक शेअर केला आहे. अवघ्या काही मिनिंटात गाण्याचा हा लुक व्हायरल झाला आहे. प्रभासने त्याचा आणि श्रद्धाचा डान्स करताचा लुक शेअर केला. या पोस्टरला कॅप्शन देताना त्याने लिहिले की, ‘साहो सिनेमातल्या पहिल्या गाण्याची वेळ झाली आहे. द सायको सैयां गाण्याचं टीझर लवकरच येईल.’ गाण्याची झलक पाहून असं वाटतं की साहो सिनेमातलं हे द सायको सैयां गाणं लोकांना थिरकायला लावेलच. या लुकमध्ये प्रभासने काळ्या रंगाचं टी-शर्ट आणि जॅकेट घातलं आहे. तर श्रद्धाने शॉर्ट ग्लिटरी ड्रेस घातला आहे. बहुप्रतिक्षीत साहो सिनेमात सुपरस्टार प्रभास अफलातून अक्शन सीन करताना दिसणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. साहो सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. Bottle Cap Challenge- Akshay Kumarने एकाच किकमध्ये उघडलं बाटलीचं झाकण VideoViral
Virat Kohli च्या आजीसोबतच्या फोटोवर Anushka Sharma ने केली ही कमेंट दरम्यान, काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. प्रभास आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या १ मिनिटं आणि ३९ सेकंदाच्या टीझरमध्ये प्रभास अॅक्शन अवतारात दिसत असून श्रद्धा कपूरसोबत संवाद वगळता यामध्ये संपूर्ण टीझरमध्ये प्रभास सिनेमातील खलनायकांशी दोन हात करताना दिसत आहे. चंकी पांडे, नील नितीन मुकेश आणि जॅकी श्रॉफ असे तीन खलनायक या टीझरमध्ये पाहायला मिळतात. याशिवाय अॅक्शन सोबतच या टीझरमध्ये थ्रीलर, रोमान्स आणि इमोशन्स यांचं मिश्रण पाहायला मिळत आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूर सुद्धा या सिनेमामध्ये स्टंट सीन करताना दिसणार आहे. साहो सिनेमात प्रभास आणि श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा यांसारखे तगडे कलाकार असणार आहेत. साहो हा एक अक्शन थ्रिलर सिनेमा असून येत्या १५ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सुशांत सिंह राजपुतची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा पडली प्रेमात, असं केलं प्रपोज SPECIAL REPORT: …आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

)







