सुशांत सिंह राजपुतची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा पडली प्रेमात, प्रियकराने केलं असं प्रपोज

विकी गुडघ्यांवर बसून तिला प्रपोज करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांचा हात हातात पकडला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 05:06 PM IST

सुशांत सिंह राजपुतची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा पडली प्रेमात, प्रियकराने केलं असं प्रपोज

मुंबई, 03 जुलै- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. अंकिताने स्वतः याचा स्वीकार केला आहे. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून विकी जैनसोबतचे काही फोटो शेअर करत ती दोघं नात्यात असल्याचं स्पष्ट केलं.

अंकिता आणि विकी अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. एवढंच नाही तर दोघांनी आपल्या नात्यांबद्दल गौप्यताच बाळगली होती. पण आता अंकिताने विकीसोबतचे फोटो शेअर करून ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं स्पष्ट केलं होतं. अंकिताने जे फोटो शेअर केले त्यात विकी गुडघ्यांवर बसून तिला प्रपोज करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांचा हात हातात पकडला आहे.

Virat Kohli च्या आजीसोबतच्या फोटोवर Anushka Sharma ने केली ही कमेंट

एका दुसऱ्या फोटोमध्ये विकी अंकिताच्या गालावर किस करताना दिसत आहे. हे सर्व फोटो शेअर करताना अंकिताने लिहिले की, ‘मी याबद्दल विचार करेन.’ दोघांच्या या फोटोंमधून स्पष्ट दिसतं की दोघं एकमेकांसोबत फार आनंदी आहेत. टीव्ही जगताला अंकिता लोखंडे हे नाव काही नवं नाही. नुकतंच अंकिताने कंगना रणौतच्या मणिकर्णिका सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. अंकिता अनेक वर्ष सुशांत सिंग राजपूतसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. मात्र काही मतभेदांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं.

Bigg Boss Marathi 2- वैशालीने सुरेखा ताईंवर केला चोरीचा आरोप, नेहाने लावली आग

Loading...

SPECIAL REPORT: ...आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 05:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...