मुंबई, 03 जुलै- वर्ल्ड कपच्या मंगळवारच्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली. या सामन्यात फक्त भारतीय खेळाडूंनीच नाही तर ८७ वर्षांच्या आजीनेही संपूर्ण देशाचं मन जिंकलं. या आजी खास भारताचा सामना पाहण्यासाठी मैदानात आल्या होत्या.
सामना संपेपर्यंत त्या आजी एवढ्या प्रसिद्ध झाल्या की भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्यांना भेटायला पोहोचला. विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आजीसोबतचे अनेक फोटो शेअर केले. फक्त विराटच नाही तर रोहित शर्मानेही या आजींची आपुलकीने भेट घेतली. सध्या सोशल मीडियावर विराटच्या या कृतीचं कौतुक केलं जात आहे. सोशल मीडियावर विराटचे चाहते त्याचं भरभरून कौतुक करत आहेत. फक्त चाहतेच नाही तर त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानेही त्याची प्रशंसा केली.
हास्यकल्लोळ, पावसाने झोडपलं पण तरी मुंबईकरांची क्रिएटीव्हीटी एकदा पाहाच!
सामना संपल्यानंतर विराटने आजींसोबतचे फोटो शेअर करत म्हटलं की, ‘एवढ्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी सगळ्या चाहत्यांचे त्यातही खासकरून चारुलता पटेल यांचे आभार. चारुलता यांचं वय ८७ वर्ष आहे आणि मी त्यांच्यापेक्षा जास्त पॅशनेट आणि क्रिकेटप्रेमी चाहता आजपर्यंत पाहिला नाही.’
Bigg Boss Marathi 2- वैशालीने सुरेखा ताईंवर केला चोरीचा आरोप, नेहाने लावली आग
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे ही अभिनेत्री, तीन वर्षांपूर्वीच दिला मुलीला जन्म
विराटच्या या फोटोवर अनुष्काने हार्टवाले इमोजी पाठवत तिला ही पोस्ट किती आवडली ते सांगितलं. अनुष्काशिवाय करण वाही, रणवीर सिंग, ईशा गुप्ता, डायना पेंटीनेही विराट कोहलीचं कौतुक केलं. भारत आणि बांग्लादेशमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात चाहत्यांचा कमालीचा उत्साह होता. भारताने बांग्लादेशचा २८ धावांनी पराभव केला.
SPECIAL REPORT: ...आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा