Bottle Cap Challenge- Akshay Kumar ने एकाच किकमध्ये उघडलं बाटलीचं झाकण, Video Viral

Bottle Cap Challenge- Akshay Kumar ने एकाच किकमध्ये उघडलं बाटलीचं झाकण, Video Viral

अक्षयला बॉटल कॅप चॅलेंज करायला कोणीही सांगितलं नाही. त्याउलट जेसन स्टेथमशी प्रोत्साहित होऊन त्याने स्वतःहून हे चॅलेंज स्वीकारलं.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै- अक्षय कुमार सध्या रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.  या सिनेमातून तो पुन्हा एकदा जबरदस्त अक्शन सीन करताना दिसणार आहे. नुकताच सिनेमाच्या सेटवरून अक्षयचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्वतः अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहून तुम्ही अवाक् नाही झालात तरच नवल.

इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये अक्षय एका बाटलीचं झाकण हाताने नाही तर पायाने किक मारून उघडताना दिसत आहे. अक्षयचं हे नवीन स्किल पाहून त्याने नेमकी हे कसं केलं असेल असा प्रश्न साऱ्यांनाच पडला असेल. अक्षयने एका किकने बाटलीचं झाकणं बाटली न पाडता कसं काय उघडलं हे पाहण्यासाठी युझर अनेकदा हा व्हिडिओ पाहत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॉलिवूडमध्ये सध्या बॉटल कप चॅलेंज सुरू आहे. यात मार्शल आर्ट्सचे तज्ज्ञ एका किकने बाटलीचं झाकण उघडतानाचा व्हिडिओ पोस्ट करत आहेत.’

Virat Kohli च्या आजीसोबतच्या फोटोवर Anushka Sharma ने केली ही कमेंट

 

View this post on Instagram

 

I couldn't resist 😉 #BottleCapChallenge Inspired by my action idol @JasonStatham, I will repost/retweet the Best I see, come on Guys and Girls get your Bottle out and your Legs in the Air, Let's Do This 💪🏽 #FitIndia #WednesdayMotivation

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on

सुशांत सिंह राजपुतची एक्स गर्लफ्रेंड पुन्हा पडली प्रेमात, असं केलं प्रपोज

यापुढे अक्षयने लिहिले की, ‘मी स्वतःला रोखूच शकलो नाही. बॉटल कप चॅलेंज. मी अक्शनमध्ये ज्यांना आदर्श मानतो त्या जेसन स्टेथमकडून मी प्रेरित झालो आहे.’ यानंतर अक्षयने आपल्या चाहत्यांना या चॅलेंजमध्ये भाग घेण्याचं आवाहन केलं. तसेच ज्यांचा व्हिडिओ सर्वोत्तम असेल अक्षय तो व्हिडिओ रिपोस्ट आणि रीट्वीट करेल असेही त्याने मान्य केलं. अक्षय पुढे म्हणाला की, त्याला बॉटल कॅप चॅलेंज करायला कोणीही सांगितलं नाही. त्याउलट जेसन स्टेथमशी प्रोत्साहित होऊन त्याने स्वतःहून हे चॅलेंज स्वीकारलं.

SPECIAL REPORT: ...आणि मैदानात गायीनं घेतला फुटबॉलचा ताबा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 06:48 PM IST

ताज्या बातम्या