जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Pathaan Trailer Out: एकीकडे पठाणचा वाद दुसरीकडे ट्रेलरचा धमाका; रिलीज होताच अवघ्या वीस मिनिटांतच नवा रेकॉर्ड

Pathaan Trailer Out: एकीकडे पठाणचा वाद दुसरीकडे ट्रेलरचा धमाका; रिलीज होताच अवघ्या वीस मिनिटांतच नवा रेकॉर्ड

पठाण ट्रेलर आऊट

पठाण ट्रेलर आऊट

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘पठाण’ चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. पण रिलीज होताच प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया उमटत आहेत पाहा

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ पठाण ’ चा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटातुन शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याचे चाहते या सिनेमाची आवर्जून वाट पाहत आहेत. या चित्रपटाला प्रदर्शनाआधीच अनेक वादांना सामोरे जावे लागले होते. चित्रपटातील ‘बेशरम रंग ’ गाण्यामुळे त्याच्यावर बॉयकॉट करण्याची मागणी केली जात असतानाच मात्र आता सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. नक्की काय आहे ट्रेलरमध्ये जाणून घ्या. संपूर्ण ट्रेलरमध्ये शाहरुखचा बोलबाला आहे. त्याचबरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. अॅक्शन आणि रोमान्सने पठाण चा ट्रेलर भरलेला आहे. शाहरुख आणि दीपिका दोघेही ट्रेलर मध्ये भरपूर ॲक्शन करताना दिसत आहेत. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळतेय. या दोघांशिवाय जॉन अब्राहमचा रॉकिंग रावडी अंदाज ट्रेलर मध्ये दिसून येतोय. ट्रेलरमध्ये जॉन अब्राहम हा व्हिलन तर शाहरुख आणि दीपिका हे दोघे देशाच्या रक्षणासाठी लढणारे सैनिक दाखवले आहेत.  दोघेही एका मिशनवर सोबत आहे. या चित्रपटात जबरदस्त अॅक्शनच्या जोडीला खतरनाक व्हीएफक्स आणि स्टंट देखील पाहायला मिळणार आहेत. हेही वाचा - Ved Movie: शर्मिला ठाकरेंनाही ‘वेड’ची भुरळ; सिनेमा पाहण्यासाठी थेट अख्खं थिएटर केलं बुक! एकूणच रोमान्स, कॉमेडी, ॲक्शन असा संपूर्ण मसाला पठाण च्या ट्रेलरमध्ये दिसतोय. ट्रेलरमध्ये स्टंट सीन्स आकर्षित करत आहेत. याशिवाय डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांची स्टाइलही भाव खाऊन जात आहे. या ट्रेलरची  उत्सुकता सर्वांना असल्याने अल्पावधीतच हा ट्रेलर लाखों लोकांपर्यंत पोहोचला आहे. अवघ्या वीस मिनिटातच ट्रेलरला १ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

जाहिरात

‘पठाण’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडला आहे. ‘बेशरम रंग’ चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले तेव्हा भगव्या बिकिनीमुळे ते वादात सापडले होते. चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी अजूनही अनेक ठिकाणी सुरू आहे. या गाण्यावरही सेन्सॉरची कात्री चालली आहे. दुसरीकडे, शाहरुखच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ असून ते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावर्षी शाहरुखचे तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 25 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत

गेली काही दिवस वादाचा मुद्दा ठरलेल्या आणि नाना प्रकारे ट्रॉल केला गेलेला ‘‘पठाण’’ आता अधिकच चर्चेत आला आहे. कारण टिझरपासून ज्या सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे त्या पठाण सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झालाय. बॉलीवुड बादशाह शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेला पठाण सिनेमाची गेली अनेक वर्ष चर्चा आहे, अखेर या चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते सुखावले आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला ‘पठाण’ 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात